
Bonus Shares | सध्या जर तुम्ही शेअर बाजारात गुंतवणूक करून मोफत बोनस शेअर्स मिळवू इच्छित असाल तर, तुमच्यासाठी एक खुशखबर आहे. इंटेलव्हेट कॅपिटल व्हेंचर्स लिमिटेड कंपनी आपल्या विद्यमान पात्र शेअरधारकांना मोफत बोनस शेअर्स वाटप करणार आहे. Intellivate Capital Ventures Share Price
कंपनीने सेबीला दिलेल्या माहितीत कळवले आहे की, इंटेलिव्हेट कॅपिटल व्हेंचर्स कंपनीच्या संचालकांनी आपल्या गुंतवणुकदारांना 1 शेअरवर 2 बोनस शेअर्स मोफत देण्याची घोषणा केली आहे. आज सोमवार दिनांक 5 फेब्रुवारी 2024 रोजी इंटेलिव्हेट कॅपिटल व्हेंचर्स कंपनीचे शेअर्स 1.97 टक्के वाढीसह 134.45 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.
सेबीला दिलेल्या माहितीत इंटेलव्हेट कॅपिटल व्हेंचर्स लिमिटेड कंपनीने कळवले आहे की, कंपनी आपल्या शेअरधारकांना 1 रुपये दर्शनी मूल्य असलेल्या एका शेअरवर 2 बोनस शेअर्स देणार आहे. बोनस इश्यूची पात्रता निश्चित करण्यासाठी कंपनीने 7 फेब्रुवारी हा दिवस रेकॉर्ड डेट म्हणून निश्चित केला आहे. म्हणजेच या दिवशी ज्या गुंतवणूकदारांकडे कंपनीचे शेअर्स असतील, त्यांना मोफत बोनस शेअर्स मिळतील. या कंपनीची बोनस शेअर्स वाटप करण्याची ही पहिलीच वेळ असेल. यापूर्वी 2011 मध्ये कंपनीने आपले शेअर्स 10 तुकड्यात विभाजित केले होते.
मागील आठवड्यात शुक्रवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये या कंपनीचे शेअर्स 134.45 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. 29 जानेवारी 2024 पासून या कंपनीच्या शेअर्समध्ये अप्पर सर्किट लागत आहे. मागील 6 महिन्यांत या कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणुकदारांना 200 टक्क्यांपेक्षा जास्त नफा कमावून दिला आहे.
मागील एका वर्षात या कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना 1000 टक्के नफा कमावून दिला आहे. या कंपनीच्या शेअर्सची 52 आठवड्यांची नीचांक किंमत पातळी 12.21 रुपये होती. तर आज या कंपनीचे शेअर्स आपल्या नवीन उच्चांक किंमत पातळीवर ट्रेड करत आहेत. या कंपनीचे एकूण बाजार भांडवल 578.51 कोटी रुपये आहे.
महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.