TFCI Share Price | श्रीमंत करणार हा शेअर! बंपर तेजी, 1 महिन्यात दिला 95 टक्के परतावा, खरेदी करणार का?

TFCI Share Price | टुरिझम फायनान्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया या स्मॉलकॅप कंपनीचे शेअर्स सोमवारी 18 टक्क्यांच्या वाढीसह 247 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. आज मात्र या कंपनीच्या शेअर्समध्ये मजबूत नफा वसुली पाहायला मिळाली आहे. मागील एका महिन्यात टुरिझम फायनान्स कॉर्पोरेशन कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना 95 टक्केपेक्षा जास्त नफा कमावून दिला आहे.

मागील एका महिन्यात या कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणूकदारांचे पैसे दुप्पट केले आहेत. तर आता भारतातील दिग्गज म्युच्युअल फंडाने देखील या कंपनीच्या शेअर्समध्ये मोठी गुंतवणूक केली आहे. या कंपनीच्या शेअर्सची 52 आठवड्यांची नीचांक किंमत पातळी 66.75 रुपये होती. आज मंगळवार दिनांक 6 फेब्रुवारी 2024 रोजी टुरिझम फायनान्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया कंपनीचे शेअर्स 6.87 टक्के घसरणीसह 218.10 रुपये किमतीवर क्लोज झाले आहेत.

नुकताच क्वांट म्युच्युअल फंडाने टूरिझम फायनान्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया कंपनीचे 600000 शेअर्स खरेदी केले आहे. त्यामुळे या कंपनीचे शेअर्स मजबूत तेजीत आले होते. अवघ्या 2 ट्रेडिंग सेशनमध्ये या कंपनीच्या शेअर्सची किंमत 26 टक्क्यांनी वर गेली होती. क्वांट म्युच्युअल फंडाने टूरिझम फायनान्स कॉर्पोरेशन कंपनीचे 600000 शेअर्स म्हणजेच जवळपास 0.66 टक्के भागभांडवल 208.57 रुपये प्रति शेअर किमतीवर खरेदी केले आहे.

मागील एका वर्षात टुरिझम फायनान्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना 220 टक्क्यांपेक्षा जास्त परतावा कमावून दिला आहे. 6 फेब्रुवारी 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 74.65 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. टूरिझम फायनान्स कॉर्पोरेशन कंपनीचे शेअर्स 5 फेब्रुवारी 2024 रोजी 247 रुपये किमतीवर ट्रेड करत होते.

मागील 6 महिन्यांत या कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना 145 टक्क्यांपेक्षा जास्त परतावा कमावून दिला आहे. मागील 6 महिन्यांत या कंपनीच्या शेअर्सची किंमत 97.64 रुपयेवरून वाढून 247 रुपये किमतीवर पोहचली होती. मागील 5 दिवसांत या कंपनीच्या शेअर्सची किंमत 30 टक्क्यांनी वाढली आहे.

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | TFCI Share Price NSE Live 06 February 2024.