Sarveshwar Foods Share Price | शेअरची किंमत 10 रुपये, 5 दिवसात 35% परतावा दिला, खरेदीनंतर संयम श्रीमंत करेल

Sarveshwar Foods Share Price | बुधवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये शेअर बाजारात अस्थिरता असताना सर्वेश्वर फूड्स लिमिटेड कंपनीचे शेअर्स 3 टक्क्यांच्या वाढीसह 10 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. तर आज देखील या कंपनीच्या शेअर्समध्ये जोरदार खरेदी पाहायला मिळत आहे. सर्वेश्वर फूड्स लिमिटेड कंपनीचे एकूण बाजार भांडवल 970 कोटी रुपये आहे.
या कंपनीच्या शेअर्सची 52 आठवड्यांची उच्चांक किंमत पातळी 15.69 रुपये होत. तर नीचांक किंमत पातळी 4 रुपये होती. आज गुरूवार दिनांक 8 फेब्रुवारी 2024 रोजी सर्वेश्वर फूड्स लिमिटेड कंपनीचे शेअर्स 1.51 टक्के वाढीसह 10.10 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.
सर्वेश्वर फूड्स लिमिटेड कंपनीच्या शेअर्सने मागील 5 दिवसांत आपल्या गुंतवणूकदारांना 35 टक्के परतावा कमावून दिला आहे. 1 फेब्रुवारी रोजी या कंपनीचे शेअर्स 7.4 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. ते आता 10.10 रुपये किमतीवर पोहचले आहेत. नुकतीच या कंपनीने सेबीला माहिती दिली की, त्यांनी भारत सरकारच्या नाफेड एजन्सी सोबत करार केला आहे. या करारा अंतर्गत सर्वेश्वर फूड्स लिमिटेड कंपनी भारत सरकारच्या ‘भारत ब्रँड’ या धोरणात्मक योजने अंतर्गत उच्च दर्जाच्या डाळी, तांदूळ आणि इतर जीवनावश्यक वस्तू लोकांना अनुदानित किमतीवर उपलब्ध करून देणार आहे.
‘भारत ब्रँड’ ही केंद्र सरकारची एक महत्त्वाकांक्षी योजना असून त्या अंतर्गत किंमत स्थिरता सुनिश्चित करण्यासाठी, अन्नधान्य महागाई रोखण्यासाठी आणि भारतीय लोकांना अन्न पोषण पुरवण्यासाठी परवडणाऱ्या किमतीत तांदूळ, डाळी इत्यादी उपलब्ध व्हावे, म्हणून लाँच करण्यात आली आहे. सध्या ‘भारत ब्रँड’ अंतर्गत डाळ आणि पीठ देशभरात वितरीत केले जात असून, त्याला ग्राहकांनी भरघोस प्रतिसाद दिला आहे.
आता मोदी सरकारने ‘भारत ब्रँड’ अंतर्गत देशात स्वस्त आणि परवडणाऱ्या किमतीवर तांदूळ वितरण करण्याची योजना आखली आहे. भारत सरकारने 6 फेब्रुवारी 2024 पासून पॅकेज केलेले अनुदानित तांदूळ ‘भारत राइस’ या नावाने विकायला सुरुवात केली आहे.
जम्मू-काश्मीरमध्ये नाफेडमार्फत भारत ब्रँडच्या तांदूळ वितरणाची जबाबदारी सर्वेश्वर फूड्स कंपनीला देण्यात आली आहे. ‘भारत राइस’ या नावाने विकला जाणारा तांदूळ 29 रुपये किलो किंमतीवर नाफेड आणि एनसीसीएफच्या आऊटलेटद्वारे सर्वसामान्यांना उपलब्ध करून दिला जाणार आहे. यासह हा नवीन तांदूळ ब्रँड आघाडीच्या ई-कॉमर्स प्लॅटफॉर्मवरून देखील विकला जाईल.
महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
News Title | Sarveshwar Foods Share Price NSE Live 08 February 2024.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
-
VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
-
VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
-
VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
-
पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
-
कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
-
महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
-
महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
-
सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
-
सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं
राहुन गेलेल्या बातम्या
-
Ashok Leyland Share Price | मल्टिबॅगर अशोक लेलँड शेअर्स फोकसमध्ये, लेटेस्ट टार्गेट प्राईस अपडेट - NSE: ASHOKLEY
-
Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज शेअर्सची भरारी; ग्लोबल फर्मकडून टार्गेट प्राईस जाहीर - NSE: RELIANCE
-
Jio Finance Share Price | जिओ फायनान्स शेअर्समध्ये तेजी, तज्ज्ञांनी दिले फायद्याचे संकेत, टार्गेट जाणून घ्या - NSE: JIOFIN
-
NTPC Green Energy Share Price | सरकारी कंपनीचा शेअर मालामाल करणार, मिळेल मजबूत परतावा - NSE: NTPCGREEN
-
Vodafone Idea Share Price | पेनी स्टॉक 5 टक्क्यांनी कोसळला, तज्ज्ञांनी सांगितलं स्टॉक Hold करा - NSE: IDEA
-
Jio Finance Share Price | जिओ फायनान्शिअल शेअरबाबत तज्ज्ञांकडून फायद्याचे संकेत, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: JIOFIN
-
IREDA Share Price | पीएसयू शेअरबाबत तज्ज्ञांचा महत्वाचा सल्ला, या टार्गेट प्राईसवर एक्झिटचा सल्ला - NSE: IREDA
-
IRFC Share Price | मल्टिबॅगर पीएसयू स्टॉकबाबत फायद्याचे संकेत, पुढची टार्गेट प्राईस जाणून घ्या - NSE: IRFC
-
NBCC Share Price | मल्टिबॅगर शेअरची प्राईस 95 रुपये; यापूर्वी दिला 2155% परतावा, टार्गेट जाणून घ्या - NSE: NBCC
-
Vedanta Share Price | मायनिंग कंपनी शेअर्समध्ये तेजीचे संकेत, अपसाईड टार्गेट प्राईस जाणून घ्या - NSE: VEDL