
Standard Capital Share Price | स्टँडर्ड कॅपिटल मार्केट्स कंपनीचे शेअर्स बुधवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये 2.64 टक्क्यांच्या वाढीसह 2.72 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. तर आज या कंपनीचे शेअर्स अप्पर सर्किटमध्ये अडकले आहे. स्टँडर्ड कॅपिटल मार्केट्स कंपनीचे एकूण बाजार भांडवल 398 कोटी रुपये आहे.
मागील एका आठवड्यात स्टँडर्ड कॅपिटल मार्केट्स कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणूकदारांना 4 टक्के परतावा कमावून दिला आहे. तर मागील तीन महिन्यांत या कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना 49 टक्के परतावा कमावून दिला आहे.
मागील एका वर्षात स्टँडर्ड कॅपिटल मार्केट्स कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणूकदारांचे पैसे 189 टक्के वाढवले आहेत. मागील 3 वर्षांत या कंपनीच्या शेअर्सने लोकांना 6060 टक्के परतावा कमावून दिला आहे. मागील 5 वर्षांत या कंपनीच्या शेअर्सने गुंतवणूकदारांचे पैसे 6821 टक्क्यांनी वाढवले आहे. आज गुरूवार दिनांक 15 फेब्रुवारी 2024 रोजी स्टँडर्ड कॅपिटल मार्केट्स स्टॉक 4.74 टक्के वाढीसह 2.87 रुपये किमतीवर ट्रेड करत आहे.
22 मार्च 2019 रोजी स्टँडर्ड कॅपिटल मार्केट कंपनीचे शेअर्स 4 पैसे किमतीवर ट्रेड करत होते. तर आता या कंपनीचे शेअर्स 2.87 रुपये किमतीवर पोहचले आहे. स्टँडर्ड कॅपिटल मार्केट्स कंपनीने सेबीला कळवले आहे की, कंपनीच्या संचालक मंडळाची बैठक मंगळवार दिनांक 13 फेब्रुवारी रोजी आयोजित करण्यात आली होती. या बैठकीमध्ये स्टँडर्ड कॅपिटल ॲडव्हायझर्स लिमिटेड नावाची पूर्ण मालकीची उपकंपनी स्थापन करण्याचा प्रस्ताव मंजूर करण्यात आला आहे.
यासह, कंपनीने आकाश भाटिया यांना स्टँडर्ड कॅपिटल मार्केट कंपनीचे मुख्य वित्तीय अधिकारी म्हणून नियुक्त केले आहे. स्टँडर्ड कॅपिटल ॲडव्हायझर्स लिमिटेड कंपनीचे अधिकृत भाग भांडवल 5 कोटी रुपये असेल. त्यात 10 रुपये दर्शनी मूल्याचे 50 लाख इक्विटी शेअर्स असतील. ही नवीन कंपनी मर्चंट बँकिंगचा व्यवसाय करणार आहे.
महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.