14 May 2024 9:08 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Horoscope Today | तुमचे बुधवारचे राशिभविष्य | 15 मे 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा बुधवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या BEML Share Price | सरकारी कंपनीचा स्टॉक रॉकेट तेजीत, 2 दिवसात 18% परतावा दिला, खरेदीला ऑनलाईन गर्दी LIC Share Price | PSU LIC स्टॉक तेजीत वाढणार, तज्ज्ञांकडून स्ट्राँग बाय रेटिंग, टार्गेट प्राईस जाहीर NMDC Share Price | NMDC सहित हे 5 शेअर्स मोठा परतावा देणार, मिळेल 35 टक्केपर्यंत परतावा L&T Share Price | L&T सहित हे 10 शेअर्स 40 टक्केपर्यंत परतावा देतील, अल्पावधीत कमाईची मोठी संधी Gold Rate Today | खुशखबर! आज सोन्याचा भाव जोरदार धडाम झाला, पटापट तुमच्या शहरातील नवे दर तपासून घ्या Polycab Share Price | तज्ज्ञांकडून पॉलीकॅब इंडिया स्टॉकवर 'बाय' रेटिंग, 953% परतावा देणारा शेअर तेजीत वाढणार
x

IPO GMP | आला रे आला स्वस्त IPO आला! पहिल्याच दिवशी मोठा परतावा मिळेल, ग्रे मार्केटमध्ये धुमाकूळ

IPO GMP

IPO GMP | सध्या जर तुम्ही IPO मध्ये गुंतवणूक करून मजबूत कमाई करू इच्छित असाल तर तुमच्यासाठी एक खुशखबर आहे. एक्झिकॉम टेली-सिस्टम्स या इलेक्ट्रिक वाहन चार्जर निर्माता कंपनीचा IPO कंपनी 27 फेब्रुवारी ते 29 फेब्रुवारी दरम्यान गुंतवणुकीसाठी खुला होणार आहे. या कंपनीने आपल्या IPO शेअर्सची प्राइस बँड 135 रुपये ते 142 रुपये प्रति शेअर निश्चित केली आहे. या IPO चा आकार 429 कोटी रुपये आहे.

एक्झिकॉम टेली-सिस्टम्स कंपनीच्या IPO मध्ये 329 कोटी रुपये मूल्याचे फ्रेश इक्विटी शेअर्स आणि 70.42 लाख शेअर्स ऑफर फॉर सेल अंतर्गत खुल्या बाजारात विकले जाणार आहेत. कंपनीचे प्रवर्तक नेक्स्टवेव्ह कम्युनिकेशन्स आपले 70.42 लाख इक्विटी शेअर्स IPO मध्ये विकणार आहेत. एक्झिकॉम टेली-सिस्टम्स कंपनीने 135 रुपये प्रति शेअर या इश्यू किमतीवर 52.59 लाख इक्विटी शेअर्सचे प्री-IPO प्लेसमेंट लाँच केले असून त्याचे एकूण मुल्य 71 कोटी रुपये आहे.

नेक्स्टवेव्ह कम्युनिकेशन्स कंपनीने एक्झिकॉम टेली-सिस्टम्स कंपनीचे एकूण 76.55 टक्के भाग भांडवल धारण केले आहे. तर HFCL कंपनीने एक्झिकॉम टेली-सिस्टम्स कंपनीचे 7.74 टक्के भाग भांडवल धारण केले आहे. एक्झिकॉम टेली-सिस्टम्स कंपनीमध्ये सर्व प्रवर्तकांचा एकूण वाटा 93.28 टक्के आहे.

ग्रे मार्केटचा आढावा घेणाऱ्या तज्ज्ञांच्या मते, एक्झिकॉम टेली-सिस्टम्स कंपनीचे शेअर्स ग्रे मार्केटमध्ये 80 रुपये प्रीमियम किमतीवर ट्रेड करत आहेत. म्हणजेच हा स्टॉक 222 रुपये किमतीवर सूचीबद्ध होऊ शकतो. ज्या लोकांना या कंपनीचे शेअर्स वाटप केले जातील त्यांना पहिल्याच दिवशी 56 टक्के नफा मिळू शकतो. कंपनी 1 मार्च 2024 रोजी गुंतवणूकदारांना शेअर्स वाटप करेल. 5 मार्च रोजी या कंपनीचे शेअर्स बीएसई आणि नॅशनल स्टॉक एक्स्चेंज या दोन्ही स्टॉक एक्सचेंजवर सूचीबद्ध केले जातील.

IPO इश्यूमधून उभारलेला निधी एक्झिकॉम टेली-सिस्टम्स कंपनी आपल्या तेलंगणा राज्यात स्थित असलेल्या उत्पादन केंद्रात नवीन उत्पादन लाइन उभारण्यासाठी, R&D मधील गुंतवणूक तसेच उत्पादन विकास, कर्जाची परतफेड, सामान्य कॉर्पोरेट उद्देशांवर खर्च करणार आहे. मोनार्क नेटवर्थ कॅपिटल, सिस्टेमॅटिक्स कॉर्पोरेट सर्व्हिसेस आणि युनिस्टोन कॅपिटल सर्व्हिसेस यांना एक्झिकॉम टेली-सिस्टम्स कंपनीने IPO चे बुक-रनिंग लीड मॅनेजर म्हणून नियुक्त केले आहे. तर Link Intime India Pvt Ltd या कंपनीला IPO रजिस्ट्रार म्हणून नियुक्त केले आहेत.

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | IPO GMP Exicom Tele-Systems IPO 23 February 2024.

हॅशटॅग्स

IPO GMP(49)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x