
Jio Financial Services Share Price | भारतातील सर्वात श्रीमंत उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या जिओ फायनान्शिअल सर्व्हिसेस लिमिटेड कंपनीच्या शेअर्समध्ये अफाट तेजी पाहायला मिळत आहे. कालच्या ट्रेडिंग सेशनमध्ये या कंपनीचे शेअर्स 15 टक्के वाढीसह ट्रेड करत होते.
मागील पाच ट्रेडिंग सेशनपासून या कंपनीच्या शेअर्समध्ये जबरदस्त तेजी पाहायला मिळाली आहे. शुक्रवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये या कंपनीच्या शेअर्सने आपली विक्रमी उच्चांक किंमत स्पर्श केली होती. शुक्रवार दिनांक 23 फेब्रुवारी 2024 रोजी जिओ फायनान्शिअल सर्व्हिसेस लिमिटेड कंपनीचे शेअर्स 10.62 टक्के वाढीसह 335 रुपये किमतीवर क्लोज झाले होते.
जिओ फायनान्शिअल सर्व्हिसेस लिमिटेड कंपनीच्या शेअर्समध्ये तेजी सुरू असताना, रिलायन्स इंडस्ट्रीज कंपनीचे शेअर्स देखील 1 टक्के वाढीसह 2,988.80 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. सध्या रिलायन्स इंडस्ट्रीज ही कंपनी भारतात बाजार भांडवलाच्या बाबतीत पहिल्या क्रमांकावर आहे.
या कंपनीचे एकूण बाजार भांडवल 250 बिलियन डॉलर्स म्हणजेच जवळपास 20.72 लाख कोटी रुपये आहे. 13 फेब्रुवारी 2024 रोजी रिलायन्स इंडस्ट्रीज कंपनीचे एकूण मार्केट कॅप 20 लाख कोटी रुपये नोंदवले गेले होते. 20 लाख कोटी बाजार भांडवलाचा टप्पा स्पर्श करणारी रिलायन्स इंडस्ट्रीज ही भारतातील पहिली कंपनी आहे.
रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेड कंपनीने मागील काही दिवसापासून पेटीएम वॉलेट खरेदीबाबत सुरू असलेल्या चर्चेला पूर्णविराम दिला आहे. कंपनीने माहिती दिली की, पेटीएम वॉलेट खरेदीबाबत कोणतीही चर्चा सुरू नाही. जिओ फायनान्शिअल सर्व्हिसेस लिमिटेड कंपनीचे एकूण बाजार भांडवल 2,13,216.22 कोटी रुपये आहे.
टेक्निकल चार्टवर जिओ फायनान्शिअल सर्व्हिसेस स्टॉकमध्ये मजबूत वाढीचे संकेत मिळत आहेत. तज्ञांच्या मते, या कंपनीचे शेअर्स 350 रुपये किंमत स्पर्श करू शकतो. तज्ञांनी गुंतवणुकदारांना जिओ फायनान्शिअल सर्व्हिसेस स्टॉक खरेदी करताना 310 रुपये किमतीवर स्टॉप लॉस लावण्याचा सल्ला दिला आहे. डिसेंबर 2023 पर्यंत या कंपनीच्या प्रवर्तकांनी कंपनीचे 47.12 टक्के भाग भांडवल धारण केले आहे.
मागील 5 दिवसात या कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना 22 टक्के परतावा कमावून दिला आहे. मागील एका महिन्यात या कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणुकदारांना 40 टक्क्यांपेक्षा जास्त परतावा कमावून दिला आहे. या कंपनीच्या शेअर्सची 52 आठवड्यांची उच्चांक किंमत पातळी 347 रुपये होती. तर नीचांक किंमत पातळी 202.80 रुपये होती.
महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.