9 May 2024 10:57 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
SBI Mutual Fund | नोकरदारांना श्रीमंत बनवणारी SBI म्युच्युअल फंडाची योजना, 185 पटीने पैसा वाढतोय Zero Tax on Salary | पगारदारांनो! 12 लाखांपर्यंतच्या पगारावर टॅक्स लागणार नाही, तुमचे सर्व पैसे खिशातच राहतील Numerology Horoscope | 09 मे 2024 | तुमची जन्म तारीख किती? अंकज्योतिष शास्त्र सांगेल तुमचा गुरुवारचा दिवस कसा असेल Horoscope Today | तुमचे गुरुवारचे राशिभविष्य | 09 मे 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा गुरुवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या South Indian Bank Share Price | शेअर प्राईस 27 रुपये! स्टॉकमध्ये मजबूत ब्रेकआउट, लवकरच मोठा परतावा देईल Gold Rate Today | खुशखबर! आज अक्षय्य तृतीयेच्या 2 दिवस आधी सोन्याचा भाव धडाम झाला, नवे दर तपासून घ्या Sterling and Wilson Share Price | कंपनीत रिलायन्स ग्रुपचा हिस्सा! 1 महिन्यात दिला 41% परतावा, स्टॉक अप्पर सर्किटवर
x

Tata Steel Share Price | टाटा तिथे नो घाटा! टाटा स्टील शेअर्स मालामाल करणार, तज्ज्ञांकडून मजबूत टार्गेट प्राइस जाहीर

Tata Steel Share Price

Tata Steel Share Price | टाटा समूहाचा भाग असलेल्या टाटा स्टील कंपनीचे शेअर्स शुक्रवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये 145.40 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. या कंपनीचे एकूण बाजार भांडवल 1.82 लाख कोटी रुपये आहे. टाटा स्टील कंपनीच्या शेअर्सची 52 आठवड्यांची उच्चांक किंमत पातळी 147.40 रुपये होती. तर नीचांक किंमत पातळी 101.55 रुपये होती.

मागील काही दिवसांपासून टाटा स्टील कंपनीच्या शेअर्समध्ये अस्थिरता पाहायला मिळत आहे. मागील एका महिन्यात टाटा स्टील कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणूकदारांना 133 रुपये किंमत पातळीवरून 9 टक्के परतावा कमावून दिला आहे. सोमवारी हा शेअर 1.58% घसरून 143.15 रुपयांवर ट्रेड करत आहे.

मागील 6 महिन्यांत टाटा स्टील कंपनीच्या शेअर्सची किंमत 117 रुपये किंमत पातळीवरून 25 टक्के वाढली आहे. मागील 1 वर्षात टाटा स्टील कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना 37 टक्के परतावा कमावून दिला आहे. 1 मार्च 2019 रोजी टाटा स्टील कंपनीचे शेअर्स 50.76 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. ज्या लोकांनी या किमतीवर टाटा स्टील स्टॉक खरेदी केला होता, त्यांच्या गुंतवणुकीचे मूल्य 187 टक्के वाढले आहे.

1 जानेवारी 1999 रोजी टाटा स्टील कंपनीचे शेअर्स 6.95 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. या किंमत पातळीपासून, टाटा स्टील लिमिटेड कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना 1992 टक्के नफा कमावून दिला आहे. टाटा स्टील कंपनीने आपल्या गुंतवणुकदारांना बऱ्याच वेळा लाभांश देखील वाटप केला आहे. 2023 मध्ये या कंपनीने आपल्या गुंतवणुकदारांना दर्शनी मुल्यावर 360 टक्के लाभांश वाटप केला होता.

अनेक तज्ञांच्या मते, 2023 ते 2026 दरम्यान भारतात स्टील आणि धातूची मागणी वार्षिक 6.6 टक्क्यांनी वाढू शकते. ही मागणी एकूण 145 दशलक्ष टनांपर्यंत वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे टाटा स्टील कंपनी आपली उत्पादन क्षमता वाढवण्यासाठी प्रयत्न करत आहे.

टाटा स्टीलने 2022 मध्ये आपल्या गुंतवणूकदारांना प्रति शेअर 51 रुपये लाभांश दिले होते. त्यानंतर या कंपनीचे शेअर्स 1:10 या प्रमाणात विभाजित करण्यात आले होते. 2021 आणि 2020 मध्ये टाटा स्टील कंपनीने आपल्या गुंतवणुकदारांना अनुक्रमे प्रति शेअर 25 रुपये आणि 10 रुपये लाभांश वाटप केला होता. तज्ञांच्या मते टाटा स्टील कंपनीचे शेअर्स पुढील काळात 185 रुपये किंमत स्पर्श करू शकतात.

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Tata Steel Share Price NSE Live 26 February 2024.

हॅशटॅग्स

#Tata Steel Share Price(59)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x