17 May 2024 5:17 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Horoscope Today | तुमचे शनिवारचे राशिभविष्य | 18 मे 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा शनिवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या Titagarh Rail Systems Share Price | अवघ्या 4 वर्षात दिला 3700% परतावा, तज्ज्ञांकडून शेअरला ओव्हरवेट रेटिंग, फायदा घ्या LIC Share Price | एलआयसीला सर्वात मोठा दिलासा, शेअरमध्ये सुसाट तेजी, स्टॉक प्राईस 1000 रुपयांच्या जवळ NCC Share Price | NCC स्टॉक ना ओव्हरबॉट, ना ओव्हरसोल्ड झोनमध्ये, तज्ज्ञांचा खरेदीचा सल्ला, टार्गेट प्राईस जाहीर PSU Stocks | मालामाल करणार हे टॉप 4 डिफेन्स शेअर्स, अल्पावधीत मिळेल 33 टक्केपर्यंत परतावा RailTel Share Price | या शेअरने 1 वर्षात दिला 235% परतावा, आता पुढील 10 दिवसात मालामाल करणार, खरेदीचा सल्ला Penny Stocks | गुंतवणुकीसाठी टॉप 10 पेनी स्टॉक, रोज अप्पर सर्किट हीट करून पैसे वाढवतील
x

Penny Stocks | शेअरची किंमत 45 रुपये, अल्पावधीत देईल 60 टक्के परतावा, तज्ज्ञांकडून टार्गेट प्राईस जाहीर

Penny Stocks

Penny Stocks | हॅम्प्टन स्काय रियल्टी या कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना मालामाल केले आहे. या कंपनीच्या शेअर्समध्ये गुंतवणुक करण्याबाबत तज्ञांनी सकारात्मक भावना व्यक्त केल्या आहेत. ब्रोकरेज फर्म प्रॉफिटमार्टच्या तज्ञांनी हॅम्प्टन स्काय रियल्टी कंपनीच्या स्टॉकवर 70 रुपये टार्गेट प्राइस निश्चित केली आहे. प्रॉफिटमार्ट फर्मच्या तज्ञांनी रिअल इस्टेट क्षेत्रात होणाऱ्या वाढीच्या दृष्टिकोनाने हॅम्प्टन स्काय रियल्टी कंपनीचे शेअर्स खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे. Hampton Sky Realty Share Price

पुढील काळात भारतात रिअल इस्टेट क्षेत्रात वाढ होण्याची शक्यता आहे. हॅम्प्टन स्काय रियल्टी कंपनीचे शेअर्स पुढील काळात 65-70 रुपये किंमत स्पर्श करू शकतात. मार्च 2023 मध्ये हॅम्प्टन स्काय रियल्टी कंपनीचे शेअर्स 33 रुपये या नीचांक किंमत पातळीवर ट्रेड करत होते. 17 नोव्हेंबर 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 59 रुपये किमतीवर पोहचले होते. हॅम्प्टन स्काय रियल्टी या कंपनीचे एकूण बाजार भांडवल 1,181.01 कोटी रुपये आहे. सोमवारी हा शेअर 4.71% वाढून 45.10 रुपयांवर ट्रेड करत आहे.

हॅम्प्टन स्काय रियल्टी कंपनीच्या प्रवर्तकांनी कंपनीचे 74.86 टक्के भाग भांडवल धारण केले आहे. तर सार्वजनिक गुंतवणूकदारांनी कंपनीचे 25.14 टक्के भाग भांडवल धारण केले आहे. या कंपनीच्या प्रवर्तक गटात 7 लोक आहे. यामध्ये संजीव अरोरा, काव्या अरोरा यांचा देखील समावेश आहे.

संजीव अरोरा यांच्या पोर्टफोलिओमध्ये हॅम्प्टन स्काय रियल्टी कंपनीचे 7,89,51,280 शेअर्स आहेत. तर काव्या अरोरा यांच्याकडे कंपनीचे 71,67,415 शेअर्स आहेत. या कंपनीची स्थापना 1987 साली झाली होती. ही कंपनी पूर्वी रितेश प्रॉपर्टीज अँड इंडस्ट्रीज लिमिटेड या नावाने ओळखली जात होती हॅम्प्टन स्काय रियल्टी ही कंपनी मुख्यतः रिअल इस्टेट आणि फॅशन क्षेत्रात व्यवसाय करते. कंपनीची प्रमुख उपस्थिती लुधियाना आणि दिल्लीमध्ये आहे.

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Penny Stocks of Hampton Sky Realty Share Price 26 February 2024.

हॅशटॅग्स

#Penny Stocks(470)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x