
Samvardhana Motherson Share Price | सध्या शेअर बाजारात प्रचंड अस्थिरता पाहायला मिळत आहे. काही कंपन्यांचे शेअर्स गुंतवणुकीच्या दृष्टिकोनातून आकर्षक वाटत आहेत. असाच एक स्टॉक आहे, संवर्धन मदरसन इंटरनॅशनल कंपनीचा. संवर्धन मदरसन इंटरनॅशनल कंपनीच्या शेअर्समध्ये मागील आठवड्यात शुक्रवारी तेजी पाहायला मिळाली होती. आज देखील या कंपनीच्या शेअर्समध्ये बरीच अस्थिरता आहे, मात्र स्टॉक अजूनही हिरव्या निशाणीवर ट्रेड करत आहेत.
ग्लोबल ब्रोकरेज फर्म मॉर्गन स्टॅनलीच्या तज्ञांनी संवर्धन मदरसन इंटरनॅशनल या ऑटो कंपोनंट मॅन्युफॅक्चरिंग करणाऱ्या कंपनीच्या शेअर्समध्ये गुंतवणूक करण्याचा सल्ला दिला आहे. आज सोमवार दिनांक 26 फेब्रुवारी 2024 रोजी संवर्धन मदरसन इंटरनॅशनल कंपनीचे शेअर्स 0.22 टक्के वाढीसह 115.90 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.
शेअर बाजारातील तज्ञ, संवर्धन मदरसन कंपनीच्या शेअर्सबाबत सकारात्मक भावना व्यक्त करत आहे. तज्ञांच्या मते, या कंपनीचे शेअर्स पुढील काळात 133 रुपये किंमत स्पर्श करू शकतात. मॉर्गन स्टॅन्ले फर्मच्या तज्ञांनी संवर्धन मदरसन कंपनीच्या स्टॉकवर ‘ओव्हरवेट’ रेटिंग दिली आहे.
तज्ञांनी या स्टॉकवर 133 रुपये टार्गेट प्राइस जाहीर केली आहे. 23 फेब्रुवारी 2024 रोजी या कंपनीचे शेअर्स 115 रुपये किमतीवर क्लोज झाले होते. मागील एका वर्षात या कंपनीच्या स्टॉकने आपल्या गुंतवणुकदारांचे पैसे 40 टक्क्यांनी वाढवले आहे. मागील 6 महिन्यांत या कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना 22 टक्के परतावा कमावून दिला आहे.
अनेक ब्रोकरेज हाऊसच्या तज्ञांनी संवर्धन मदरसन इंटरनॅशनल कंपनीच्या शेअर्समध्ये वाढ होण्याचा अंदाज वर्तवला आहे. कंपनी आपल्या निर्यात व्यवसायातून चांगली कमाई करण्याची शक्यता आहे. संवर्धन मदरसन इंटरनॅशनल कंपनीचा 22 टक्के महसूल निर्यात व्यवसायातून मिळतो.
पुढील काळात कंपनीच्या व्यवसाय वाढीला अधिक चालना मिळू शकते, याबाबत तज्ञ सकारात्मक आहे. संवर्धन मदरसन इंटरनॅशनल कंपनीला एरोस्पेस आणि डिफेन्स सारख्या क्षेत्रांतून देखील ऑर्डर्स मिळत आहे. कंपनीचे डिसेंबर तिमाहीचे उत्पन्न देखील तज्ञांच्या अपेक्षेपेक्षा चांगले नोंदवले गेले होते.
महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.