
Tata Motors Share Price | टाटा समूहाचा भाग असलेल्या टाटा मोटर्स कंपनीचे शेअर्स मंगळवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये 3.02 टक्क्यांच्या वाढीसह 965 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. तर आज देखील या कंपनीच्या शेअर्समध्ये मजबूत खरेदी पाहायला मिळत आहे. टाटा मोटर्स कंपनीचे शेअर्स आपल्या 400.40 रुपये या 52 आठवड्यांच्या नीचांक किंमत पातळीवरून 141.01 टक्क्यांनी वाढले आहेत. आज बुधवार दिनांक 28 फेब्रुवारी 2024 रोजी टाटा मोटर्स स्टॉक 1.10 टक्के वाढीसह 973.30 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.
SBI सिक्युरिटीज फर्मने आपल्या अहवालात म्हंटले आहे की, टाटा मोटर्स कंपनीची एकत्रित विक्री 25 टक्के वाढीसह 1,10,577 कोटी रुपये, EBITDA 42 टक्के वाढीसह 15,418 कोटी रुपये आणि PAT 140 टक्के वाढीसह 7,145 कोटी रुपये नोंदवला गेला आहे. टाटा मोटर्स कंपनीचे निव्वळ ऑटोमोटिव्ह कर्ज अनुक्रमे 20,700 कोटी रुपयेवर आले आहे. त्यामुळे कंपनीच्या EBITDA मार्जिनमध्ये वार्षिक आधारे 200 बेस पॉइंट्सची वाढ झाली आहे.
याकाळात कंपनीचा EBITDA वाढून 14 टक्क्यांवर पोहोचला आहे. टाटा मोटर्स कंपनीच्या किरकोळ वाहनांच्या विक्रीत वार्षिक आधारावर 29 टक्क्यांची वाढ नोंदवली गेली आहे. आर्थिक वर्ष 2024 मध्ये JLR कंपनीने आपले EBITDA मार्जिन टारगेट 8 टक्क्यांपेक्षा जास्त वाढवले आहे. 2024 या वर्षात JLR आणि टाटा मोटर्स कंपनी अनेक नवीन वाहने लॉन्च करण्याची योजना आखली आहे.
शेअर बाजारातील तज्ञांच्या मते, टाटा मोटर्स कंपनीचे शेअर्स काही महिन्यात 1,060-1,080 रुपये किमतीवर जाऊ शकतात. टाटा मोटर्स कंपनीचे शेअर्स सध्या आपल्या 5-दिवस, 10, 20 दिवस, 30 दिवस, 50 दिवस, 100 दिवस, 150 दिवस आणि 200 दिवसांच्या मूव्हिंग सरासरी किंमत पातळीच्या वर ट्रेड करत आहेत.
टाटा मोटर्स कंपनीच्या शेअर्सचा सापेक्ष सामर्थ्य निर्देशांक 74.83 वर आहे. शेअर्सचे किंमत-टू-इक्विटी गुणोत्तर 36.74 अंकावर आहे. तर किंमत-टू-बुक मूल्य 13.45 अंकावर आहे. टाटा मोटर्स कंपनीचे प्रति शेअर कमाई प्रमाण 25.49 अंकावर आहे. टाटा मोटर्स स्टॉकचा ROE 36.61 अंकावर आहे.
महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.