
Vodafone Idea Share Price | व्होडाफोन आयडिया लिमिटेड या कर्जबाजारी दूरसंचार कंपनीसाठी एक दिलासादायक बातमी आली आहे. व्होडाफोन आयडिया कंपनीने 45,000 कोटी रुपये मूल्याची पुनर्वित्त पुरवठा योजना तयार केली आहे. व्होडाफोन आयडिया लिमिटेड कंपनीने इक्विटी शेअर्स आणि कर्जाच्या माध्यमातून भांडवल उभारणी करण्याची योजना आखली आहे.
कंपनीचे प्रवर्तक इक्विटी शेअर्सच्या बदल्यात गुंतवणूक करण्यास तयार आहे. मंगळवारी व्होडाफोन आयडिया लिमिटेड कंपनी संचालक मंडळाने 20000 कोटी रुपये मूल्याच्या इक्विटी फंड उभारणीच्या योजनेचा प्रस्ताव मंजूर केला आहे. आज गुरूवार दिनांक 29 फेब्रुवारी 2024 रोजी व्होडाफोन आयडिया स्टॉक 1.10 टक्के वाढीसह 13.80 रुपये किमतीवर ट्रेड करत आहे.
व्होडाफोन आयडिया कंपनीने भांडवल उभारणी योजनेमध्ये परिवर्तनीय डिबेंचर, वॉरंट किंवा इतर सिक्युरिटीज जारी करण्याचा विचार केला आहे. हे साधन इक्विटी शेअर्समध्ये रूपांतर केले जाऊ शकतात. व्होडाफोन आयडिया लिमिटेड ही कर्जबाजारी कंपनी ग्लोबल डिपॉझिटरी रिसीप्ट, अमेरिकन डिपॉझिटरी रिसीप्ट आणि फॉरेन करन्सी कन्व्हर्टेबल बाँडद्वारे देखील भांडवल उभारण्याचा प्रयत्न करत आहे.
व्होडाफोन आयडिया कंपनीने सेबीला दिलेल्या माहितीत कळवले आहे की, कंपनीचे प्रवर्तक देखील पुनर्वित्त योजनेत गुंतवणूक करून सहभागी होणार आहे. आदित्य बिर्ला समूहाने आश्वासन दिले होते की, बिर्ला समूह कंपनीमध्ये 2000 कोटी रुपये गुंतवणूक करेल. याशिवाय कंपनी कर्ज देणाऱ्या बँकांशी देखील चर्चा करत आहे. त्यानंतर ही कंपनी इक्विटी फंड उभारणीची सुरुवात करणार आहे. व्होडाफोन आयडिया कंपनीने इक्विटी शेअर्स जारी करून आणि कर्जाच्या माध्यमातून 45,000 कोटी रुपये भांडवल उभारणी करण्याचा निर्णय घेतला आहे.
व्होडाफोन आयडिया कंपनीवर सध्या विविध बँकांचे एकूण 4500 कोटी रुपये कर्ज आहे. कंपनीच्या संचालक मंडळाने 2 एप्रिल 2024 रोजी आपल्या भागधारकांची बैठक आयोजित केली आहे. इक्विटी आणि डेटद्वारे भांडवल उभारणी करून 4G-5G आणि क्षमता विस्तार करणे हे कंपनीचे लक्ष्य आहे. यामुळे कंपनीच्या ग्राहकांना उत्तम सुविधा उपलब्ध होतील आणि कंपनी भारतात टेलिकॉम मार्केटमधील प्रचंड स्पर्धेला तोंड देऊ शकेल.
व्होडाफोन आयडिया लिमिटेड कंपनी हा एक संयुक्त उपक्रम आहे. यामध्ये ब्रिटनची Vodafone Plc आणि भारताच्या आदित्य बिर्ला समूहाने गुंतवणूक केली आहे. मागील 3 वर्षांपासून ही कंपनी निधी उभारणीचा प्रयत्न करत आहे. भारत सरकारला आणि इंडस टॉवरसारख्या मोठ्या सेवा प्रदात्याना पैसे देण्यासाठी कंपनीकडे रोख उपलब्ध नाही. त्यामुळे ही कंपनी 5G सेवा देखील सुरू करू शकली नाही. देशातील दिग्गज भारती एअरटेल आणि रिलायन्स जिओ यासारख्या कंपन्याच्या तुलनेत व्होडाफोन आयडिया कंपनी खूप मागे पडली आहे.
महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.