16 May 2024 2:20 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
PSU Stocks | सरकारी कंपनी फ्री बोनस शेअर्सचा पाऊस पाडतेय, गुंतवणुकीची संधी सोडू नका Penny Stocks | तुमचे नशीब बदलू शकतील असे 10 स्वस्त पेनी शेअर्स, प्राईस अवघी 1 रुपया ते 9 रुपये Apar Industries Share Price | श्रीमंत करणारा शेअर! अवघ्या 2 वर्षात दिला 1298 टक्के परतावा, खरेदी करणार? Bonus Shares | पटापट फ्री शेअर्स मिळवा! ही कंपनी देणार फ्री बोनस शेअर्स, यापूर्वी दिला 6300% परतावा Suzlon Share Price | शेअर प्राईस 42 रुपये! आता सुझलॉन कंपनीबाबत अपडेट आली, स्टॉक प्राईसवर होणार परिमाण? IRFC Share Price | PSU IRFC स्टॉकला या प्राईसवर मजबूत सपोर्ट, पुढची टार्गेट प्राईस मालामाल करणार Tata Power Share Price | टेक्निकल सेटअपवर टाटा पॉवर स्टॉक मजबूत, तज्ज्ञांकडून पुढची टार्गेट प्राईस जाहीर
x

Bonus Shares | फ्री शेअर्स मिळवा! ही कंपनी देतेय फ्री बोनस शेअर्स, अल्पावधीत वाढेल गुंतवणुकीचा पैसा

Bonus Shares

Bonus Shares | सनराईज एफिशिएंट मार्केटिंग कंपनीने 6 महिन्यांपूर्वी म्हणजेच सप्टेंबर 2023 मध्ये आपल्या शेअरधारकांना मोफत बोनस शेअर्स वाटप केले होते. तर आता पुन्हा एकदा ही कंपनी आपल्या पात्र शेअरधारकांना मोफत बोनस शेअर्स वाटप करणार आहे. Sunrise Efficient Share Price

27 फेब्रुवारी 2024 रोजी पार पडलेल्या संचालक मंडळाच्या बैठकीत कंपनीने बोनस शेअर वाटप करण्याचा निर्णय घेतला आहे. आज गुरूवार दिनांक 29 फेब्रुवारी 2024 रोजी सनराईज एफिशिएंट मार्केटिंग कंपनीचे शेअर्स 0.71 टक्के वाढीसह 113 रुपये किमतीवर क्लोज झाले आहेत.

सेबी फाइलिंगनुसार सनराईज एफिशिएंट मार्केटिंग कंपनीच्या संचालक मंडळाने आपल्या शेअरधारकांना 1:2 या प्रमाणात मोफत बोनस शेअर्स जारी करण्याची घोषणा केली आहे. रेकॉर्ड तारखेपर्यंत ज्या शेअरधारकाचे नाव कंपनीच्या रेकॉर्ड बुकमध्ये असेल त्यांना कंपनी मोफत बोनस शेअर्स वाटप करेल. कंपनीने अद्याप बोनस शेअर्सची रेकॉर्ड डेट जाहीर केली नाहीये. रेकॉर्ड तारीख पुढील बैठकीत ठरवली जाईल अशी माहिती संचालक मंडळाने दिली आहे.

सनराईज एफिशिएंट मार्केटिंग कंपनीच्या शेअर्सची 52 आठवड्याची उच्चांक किंमत पातळी 155 रुपये होती. तर नीचांक किंमत पातळी 101.90 रुपये होती. या कंपनीचे एकूण बाजार भांडवल 120.95 कोटी रुपये आहे. मागील 2 आठवड्यात सनराईज एफिशिएंट मार्केटिंग कंपनीच्या शेअर्सची किंमत 12 टक्केपेक्षा जास्त वाढली आहे.

सनराईज एफिशिएंट मार्केटिंग कंपनी प्रामुख्याने व्यापारी, वितरक, सुपर स्टॉकिस्ट, किरकोळ विक्रेते, घाऊक विक्रेते, आयातदार, निर्यातदार, एजंट, डीलर्स, खरेदीदार, विक्रेते, फॅब्रिकेटर्स, असेंबलर, फिटर, इंस्टॉलर म्हणून व्यवसाय करते.

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Bonus Shares on Sunrise Efficient Share Price BSE Live 29 February 2024.

हॅशटॅग्स

Bonus shares(92)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x