HAL Share Price | सरकारी कंपनीचे 2 शेअर्स खरेदी करा, मल्टिबॅगर परतावा मिळेल, नेमकं कारण काय?

HAL Share Price | भारत सरकारने सशस्त्र दलांची लढाऊ क्षमता वाढवण्यासाठी 5 मोठे करार केले आहेत. या कराराचे एकूण मूल्य 39,125 कोटी रुपये आहे. या करारात विशेषतः ब्रह्मोस सुपरसॉनिक क्रूझ क्षेपणास्त्रे, रडार, शस्त्रास्त्र प्रणाली, आणि मिग-29 जेटसाठी एरो-इंजिन खरेदीचा प्रस्ताव देण्यात आला आहे.

सरकारी निवेदनानुसार, हा करार भारतीय संरक्षण दलांच्या स्वदेशी क्षमता अधिक बळकट करेल. आणि भारताच्या परकीय चलनाची देखील मोठ्या प्रमाणात बचत होईल. भविष्यात भारताचे परकीय शस्त्र निर्मात्यांवरचे अवलंबित्व देखील कमी होईल आणि भारत आत्मनिर्भर होण्याचे उद्दिष्ट प्राप्त करेल.

भारतीय संरक्षण मंत्रालयाने हिन्दुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड कंपनीसोबत मिग-29 विमानांसाठी आरडी-33 एरो इंजिनसाठी 5249.72 कोटी रुपये मूल्याचा करार केला आहे. या एरो इंजिनची निर्मिती एचएएल कंपनीच्या कोरापुट शाखेकडून केली जाणार आहे. या एरो इंजिनांनी भारतीय वायुसेनेच्या सर्वात जुन्या MiG-29 फ्लीटची ऑपरेशनल क्षमता वाढवणे अपेक्षित आहे. भारतीय संरक्षण मंत्रालयाने लार्सन अँड टुब्रो लिमिटेड कंपनीसोबत देखील दोन करार केले आहे. या अंतर्गत क्लोज इन वेपन सिस्टम आणि उच्च क्षमतेचे रडार घेण्याबाबत करार करण्यात आला आहे.

भारतीय संरक्षण मंत्रालयाने आपल्या निवेदनात माहिती दिली आहे की, CIWS च्या खरेदीसाठी लार्सन अँड टुब्रो लिमिटेड कंपनीसोबत 7668.82 कोटी रुपये मूल्याचा करार करण्यात आला आहे. हे CIWS भारतातील निवडक ठिकाणी हवाई संरक्षण प्रदान करेल. यासोबतच हाय पॉवर रडार खरेदीसाठी लार्सन अँड टुब्रो लिमिटेड कंपनीसोबत 5,700.13 कोटी रुपये मूल्याचा करार करण्यात आला आहे.

या कराराच्या बातम्यां प्रसिद्ध होताच हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड आणि लार्सन अँड टुब्रो या दोन्ही दिग्गज कंपन्यांच्या शेअर्समध्ये जबरदस्त उलाढाल सुरू झाली होती. शुक्रवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये लार्सन अँड टुब्रो लिमिटेड कंपनीचे शेअर्स 4.39 टक्के वाढीसह 3634.50 रुपये किमतीवर क्लोज झाले होते. तर हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड कंपनीचे शेअर्स कालच्या ट्रेडिंग सेशनमध्ये 2.47 टक्के वाढीसह 3155.45 रुपये किमतीवर क्लोज झाले होते. आज शनिवार दिनांक 2 मार्च 2024 रोजी शेअर बाजाराच्या विशेष ट्रेडिंग सेशनमध्ये हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड कंपनीचे शेअर्स 2.30 टक्के वाढीसह 3,155 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत. तर लार्सन अँड टुब्रो लिमिटेड कंपनीचे शेअर्स 5.04 टक्के वाढीसह 3,652.90 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.

भारतीय संरक्षण मंत्रालयाने ब्रह्मोस क्षेपणास्त्रांच्या खरेदीसाठी देखील दोन स्वतंत्र करार केले आहेत. पहिला करार ब्रह्मोस एरोस्पेस प्रायव्हेट लिमिटेड कंपनीकडून 19,518.65 कोटी रुपये मूल्याच्या ब्रह्मोस क्षेपणास्त्रांच्या खरेदीसाठी करण्यात आला आहे. तर दुसरा 988 कोटी रुपयेचा करार BAPL कंपनीकडून जहाज-संचालित ब्रह्मोस प्रणाली खरेदीसाठी करण्यात आला आहे. ही यंत्रणा विविध युद्धनौकांवर बसवली जाईल आणि हे भारतीय नौदलाचे प्राथमिक हल्ला करणारे शस्त्र असेल.

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | HAL Share Price NSE Live 02 March 2024.