7 May 2025 2:56 PM
अँप डाउनलोड

Yes Bank Share Price | येस बँक शेअर चार्ट पॅटर्नमध्ये ब्रेकआऊटचे संकेत, शेअर्समध्ये जबरदस्त तेजी येणार

Yes Bank Share Price

Yes Bank Share Price | येस बँकेच्या शेअर्समध्ये जबरदस्त उलाढाल पाहायला मिळत आहे. मागील काही दिवसांपासून येस बँक स्टॉक विक्रीच्या दबावात ट्रेड करत आहे. आज देखील शेअर्समध्ये किंचित घसरण झाली आहे. सोमवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये येस बँकेचे शेअर्स 2 टक्के घसरणीसह 24.80 रुपये किमतीवर क्लोज झाले होते. ( येस बँक अंश )

सध्या या बँकेचे शेअर्स 32.81 रुपये या आपल्या 52 आठवड्यांच्या उच्चांक किंमत पातळीवरून 24 टक्के खाली ट्रेडिंग करत आहे. आज मंगळवार दिनांक 5 मार्च 2024 रोजी येस बँक स्टॉक 0.60 टक्के घसरणीसह 24.65 रुपये किंमतीवर ट्रेड करत आहे.

2018 या वर्षात येस बँकेचे शेअर 380 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. त्यांनतर ही बँक बुडीत कर्जाच्या जाळ्यात अडकली, आणि शेअर्स जबरदस्त वेगाने खाली आले होते. तज्ञांच्या मते, येस बँकेच्या शेअर्समध्ये 29 रुपये किमतीवर ब्रेकआउट पाहायला मिळत आहे. जर हा स्टॉक 30 रुपये किमतींच्या पार गेला तर शेअरमध्ये जबरदस्त तेजी पाहायला मिळू शकते. शेअर बाजारातील तज्ञांच्या मते, येस बँक स्टॉकच्या चार्टवर तयार झालेल्या पॅटर्ननुसार, पुढील पाच वर्षांत येस बँकेचे शेअर्स 100 रुपये किंमत स्पर्श करू शकतात.

मागील काही महिन्यांत येस बँकेच्या शेअर्समध्ये चांगली वाढ पाहायला मिळाली होती. मागील 6 महिन्यांत येस बँकेच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना 36.91 टक्के परतावा कमावून दिला आहे. मागील एका वर्षात येस बँक स्टॉकने आपल्या गुंतवणुकदारांना 47.04 टक्के परतावा कमावून दिला आहे. डिसेंबर 2023 तिमाहीत येस बँकेने 231 कोटी रुपये निव्वळ नफा कमावला होता. मागील वर्षी याच तिमाहीत येस बँकेने 51 कोटी रुपये निव्वळ नफा कमावला होता.

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Yes Bank Share Price NSE Live 05 March 2024.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

#Yes Bank Share Price(221)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या