17 May 2024 12:06 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Gold Rate Today | टेन्शन वाढलं! आज सोन्याचा भाव अजून महाग झाला, पटापट तुमच्या शहरातील नवे दर तपासून घ्या My EPF Money | पगारदारांनो! तुमच्या खात्यातही पैसे जमा झाले असतील तर पटापट तपासून घ्या, नियम बदलला Shukra Rashi Parivartan | 'या' 3 नशीबवान राशीत तुमची राशी आहे का? शुक्र राशी परिवर्तन ठरणार अत्यंत भाग्यशाली SBI Mutual Fund | पगारदारांनो! या खास योजना तुम्हाला अल्पावधीत 22 लाख रुपयेपर्यंत परतावा देतील, यादी सेव्ह करा Horoscope Today | तुमचे शुक्रवारचे राशिभविष्य | 17 मे 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा शुक्रवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या Zen Technologies Share Price | हा स्टॉक खरेदी करा, अवघ्या 4 वर्षात 1252% परतावा दिला, ऑर्डरबुक अजून मजबूत झाली Tata Motors Share Price | टाटा मोटर्स शेअरला टेक्निकल सेटअपवर मजबूत सपोर्ट, मोठ्या कमाईसाठी तयार राहा
x

Vikas Lifecare Share Price | विकास लाइफ केअरचा 5 रुपयाचा शेअर तेजीत येणार? कंपनीने घेतला मोठा निर्णय

Vikas Lifecare Share Price

Vikas Lifecare Share Price | सोमवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये बीएसई सेन्सेक्स निर्देशांक 55 अंकांच्या वाढीसह 73867 अंकांवर ट्रेड करत होते. तर निफ्टी-50 निर्देशांक 22400 अंकांच्या पातळीवर ट्रेड करत होते. कालच्या ट्रेडिंग सेशनमध्ये शेअर बाजारात जबरदस्त तेजी पाहायला मिळत होती. या तेजीत एनटीपीसी कंपनीचे शेअर्स मजबूत तेजीत वाढत होते. तर जेएसडब्ल्यू स्टील कंपनीचे शेअर्स किंचित विक्रीच्या दबावात ट्रेड करत होते. कालच्या ट्रेडिंग सेशनमध्ये बीएसई स्मॉल कॅप, निफ्टी आयटी, निफ्टी ऑटो, निफ्टी एफएमसीजी आणि निफ्टी फायनान्शियल सर्व्हिसेस निर्देशांक विक्रीच्या दबावात ट्रेड करत होते.

सोमवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये विकास लाइफ केअर कंपनीचे शेअर्स किंचित घसरणीसह ट्रेड करत होते. या कंपनीचे एकूण बाजार भांडवल 977 कोटी रुपये आहे. विकास लाइफ केअर लिमिटेड कंपनीच्या शेअर्सची 52 आठवड्यांची उच्चांक किंमत पातळी 8 रुपये होती. तर नीचांक किंमत पातळी 2.70 रुपये होती. आज मंगळवार दिनांक 5 मार्च 2024 रोजी विकास लाइफकेअर स्टॉक 0.83 टक्के घसरणीसह 5.95 रुपये किमतीवर ट्रेड करत आहे.

विकास लाइफ केअर लिमिटेड कंपनीच्या संचालक मंडळाची बैठक 2 मार्च रोजी आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत संचालकांनी 24.25 कोटी परिवर्तनीय वॉरंट वाटप करून भांडवल उभारणी करण्याचा प्रस्ताव मंजूर केला. विकास लाइफ केअर लिमिटेड कंपनीच्या उपकंपनीला नुकताच एक अत्याधुनिक अल्ट्रासोनिक गॅस मीटरचा पुरवठा करण्याची ऑर्डर मिळाली आहे.

विकास लाइफकेअर या हाय एंड स्पेशालिटी केमिकल उत्पादनांचा व्यवसाय करणाऱ्या कंपनीने 4 रुपये किमतीवर 24.25 कोटी पूर्णपणे परिवर्तनीय वॉरंट वाटप करण्याचा निर्णय घेतला आहे. कंपनीने हे परिवर्तनीय वॉरंट प्रवर्तक आणि गैर-प्रवर्तक गटातील गुंतवणूकदारांना 4 रुपये किमतीवर जारी केले आहे. यासाठी कंपनीला एकूण इश्यू किमतीच्या 25 टक्के सबस्क्रिप्शन मिळाले आहे. परिवर्तनीय वॉरंटच्या वाटपामध्ये कंपनीचे प्रवर्तक विकास गर्ग यांना 10 कोटी वॉरंट वाटप करण्यात आले आहे. उर्वरित 14.25 कोटी वॉरंट नॉन-प्रमोटर गुंतवणूकदारांना वाटप करण्यात आले आहे.

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Vikas Lifecare Share Price NSE Live 05 March 2024.

हॅशटॅग्स

Vikas Lifecare Share Price(37)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x