
Tata Motors Share Price | टाटा समूहाचा भाग असलेल्या टाटा मोटर्स कंपनीच्या शेअर्समध्ये जबरदस्त खरेदी-विक्री पाहायला मिळत आहे. आज देखील या कंपनीचे शेअर्स हिरव्या निशाणीवर ट्रेड करत आहेत. नुकताच टाटा समूहाने आपली वाहन निर्माता कंपनी टाटा मोटर्सच्या डिमर्जरबाबत घोषणा केली आहे. ( टाटा मोटर्स कंपनी अंश )
टाटा मोटर्स कंपनीचे दोन स्वतंत्र सूचीबद्ध कंपन्यांमध्ये विभाजन होणार आहे. आज बुधवार दिनांक 6 मार्च 2024 रोजी टाटा मोटर्स कंपनीचे शेअर्स 0.15 टक्के वाढीसह 1,023.40 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.
टाटा मोटर्स कंपनीने सेबीला कळवले की, त्यांनी आपला व्यावसायिक वाहन व्यवसाय आणि प्रवासी वाहन वेगळा करण्याचा निर्णय घेतला आहे. टाटा मोटर्स कंपनी पहिल्या युनिटमध्ये व्यावसायिक वाहन उद्योग आणि दुसऱ्या युनिटमध्ये इलेक्ट्रिक वाहन, जॅग्वार लँड रोव्हर आणि प्रवासी वाहन व्यवसाय ठेवणार आहे. या व्यवसाय विभाजनाचे निरीक्षण NCLT द्वारे केले जाणार आहे.
टाटा मोटर्स कंपनीच्या सर्व शेअर धारकांना दोन्ही सूचीबद्ध युनिट्समध्ये समान प्रमाणात शेअर्स वाटप केले जाणार आहे. ही प्रक्रिया पूर्ण होण्यासाठी 12 ते 15 महिने कालावधी लागण्याची शक्यता आहे. ब्रोकरेज फर्म जेएम फायनान्शिअलच्या तज्ञांनी टाटा मोटर्स कंपनीच्या शेअर्सवर 4 मार्च रोजी 1,000 रुपये टार्गेट प्राइस जाहीर केली होती. सध्या हा स्टॉक 1000 रुपये किमतीच्या वर ट्रेड करत आहे. मात्र कोटक इन्स्टिट्यूशनल इक्विटीज फर्मने टाटा मोटर्स कंपनीचे शेअर्स 950 रुपयेवर जाऊ शकतात, असा अंदाज व्यक्त केला आहे.
महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.