 
						Tata Investment Share Price | टाटा समूहाचा भाग असलेल्या टाटा इन्व्हेस्टमेंट कॉर्पोरेशन कंपनीच्या शेअर्समध्ये जबरदस्त तेजी पाहायला मिळत आहे. मागील काही दिवसापासून या कंपनीचे शेअर्स अप्पर सर्किट हीट करत आहेत. मंगळवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये टाटा इन्व्हेस्टमेंट कॉर्पोरेशन कंपनीचे शेअर्स 5 टक्के वाढीसह 8,838 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. तर आज बुधवार दिनांक 6 मार्च 2024 रोजी टाटा इन्व्हेस्टमेंट कॉर्पोरेशन कंपनीचे शेअर 5.00 टक्के वाढीसह 9,292.25 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत. ( टाटा इन्व्हेस्टमेंट कॉर्पोरेशन कंपनी अंश )
मागील चार ट्रेडिंगपासून या कंपनीचे शेअर्स अप्पर सर्किट हीट करत आहेत. अवघ्या चार दिवसात या कंपनीच्या शेअर्सची किंमत 23 टक्के मजबूत झाली आहे. मागील आठवड्यात केंद्रीय मंत्रिमंडळाने टाटा समूहाच्या दोन सेमीकंडक्टर प्लांटच्या स्थापनेला मंजुरी दिली होती.
टाटा समूहाचा भाग असलेली टाटा इलेक्ट्रॉनिक्स ही कंपनी तैवानस्थित चिपमेकर कंपनी पॉवरचिप सेमीकंडक्टर मॅन्युफॅक्चरिंग कॉर्पसोबत गुजरातमध्ये सेमीकंडक्टर लॅब तयार करणार आहे. त्यामुळे टाटा इन्व्हेस्टमेंट कॉर्पोरेशन कंपनीच्या शेअर्समध्ये जोरदार खरेदी पाहायला मिळत आहे. याशिवाय टाटा सेमीकंडक्टर असेंब्ली अँड टेस्ट प्रायव्हेट लिमिटेडमध्ये 27,000 कोटी रुपये गुंतवणूक करून मोरीगाव आसाम येथे सेमीकंडक्टर प्लांट उभारणार आहे.
टाटा इन्व्हेस्टमेंट कॉर्पोरेशन ही कंपनी एक नॉन-बँकिंग फायनान्स कंपनी म्हणून व्यवसाय करते. या कंपनीने टाटा समूहातील विविध कंपनीसह अनेक कंपन्यांच्या पोर्टफोलिओमध्ये गुंतवणूक केली आहे. टाटा इन्व्हेस्टमेंट कॉर्पोरेशन या कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना मल्टीबॅगर परतावा कमावून दिला आहे. मागील 3 महिन्यांत या कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणूकदारांना 120 टक्के परतावा कमावून दिला आहे.
मागील सहा महिन्यांत या कंपनीच्या शेअर्सची किंमत 260 टक्के वाढली आहे. मागील 1 वर्षात या कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना 336 टक्के परतावा कमवून दिला आहे. मागील दोन वर्षांत या कंपनीच्या शेअर्सची किंमत 560 टक्के मजबूत झाली आहे. YTD आधारे या कंपनीच्या शेअर्सची किंमत 107 टक्के वाढली आहे. टाटा इन्व्हेस्टमेंट कॉर्पोरेशन या कंपनीचे एकूण बाजार भांडवल 44,718.65 कोटी रुपये आहे.
महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
 
                 
		 
		 
		 
		 
		 
		 
		 
		 
		 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
		 
		 
		 
		 
		 
		 
		 
		