
NHPC Share Price | एनएचपीसी कंपनीचे शेअर्स मंगळवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये 5 टक्के वाढीसह 93 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. आज मात्र या कंपनीच्या शेअर्समध्ये किंचित नफा वसुली पाहायला मिळत आहे. पुढील दोन वर्षात एनएचपीसी कंपनीला उत्तर प्रदेशमध्ये 796.96 कोटी रुपये गुंतवणुक असलेल्या 1200 मेगावॅट क्षमतेच्या सौर ऊर्जा प्रकल्पाचे काम पूर्ण होण्याची अपेक्षा आहे. ( एनएचपीसी कंपनी अंश )
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोमवारी ‘ऑनलाइन’ पद्धतीने या सौरऊर्जा प्रकल्पाची पायाभरणी केली होती. आज गुरूवार दिनांक 7 मार्च 2024 रोजी एनएचपीसी स्टॉक 0.87 टक्के घसरणीसह 90.70 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.
एनएचपीसी कंपनीने सेबीला दिलेल्या माहितीत कळवले आहे की, एनएचपीसी कंपनीने उत्तर प्रदेशातील जालौन जिल्ह्यात ओराई येथे स्थित असलेले जालौन अल्ट्रा रिन्युएबल एनर्जी पॉवर पार्क त्यांनी बुंदेलखंड सोलर एनर्जी लिमिटेड या उपकंपनीद्वारे पूर्ण केले जाणार आहे. यासाठी जवळपास 796.96 कोटी रुपये खर्च येण्याची शक्यता आहे. एनएचपीसीने आपल्या निवेदनात म्हंटले आहे की, “गुंतवणुकीच्या मंजुरीनंतर 24 महिन्यांच्या आत हे सोलर पॉवर पार्क बांधून पूर्ण करायचे आहे. या प्रकल्पातून वार्षिक 240 कोटी युनिट वीज निर्मिती केली जाणार आहे”.
शेअर बाजारातील तज्ञांच्या मते, एनएचपीसी कंपनीच्या शेअर्समध्ये 110 रुपये किमतीवर मजबूत प्रतिकार पाहायला मिळत आहे. तर 80 रुपये किमतीवर सपोर्ट पाहायला मिळत आहे. आनंद राठी फर्मच्या तज्ञांच्या मते, एनएचपीसी स्टॉकची पुढील एक महिन्याची ट्रेडिंग रेंज 85 रुपये ते 110 रुपये दरम्यान असेल. मागील 6 महिन्यांत या कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना 74 टक्के परतावा कमावून दिला आहे.
YTD आधारे या कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना 40 टक्के परतावा कमावून दिला आहे. मागील एका वर्षात या कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणूकदारांना 133 टक्के परतावा कमावून दिला आहे. एनएचपीसी कंपनीच्या शेअर्सची 52 आठवड्यांची उच्चांक किंमत पातळी 115.84 रुपये होती. तर नीचांक पातळी 38.70 रुपये होती. या सरकारी कंपनीचे एकूण बाजार भांडवल 92,806.08 कोटी आहे.
महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.