
Tata Chemicals Share Price | टाटा समूहाचा भाग असलेल्या टाटा केमिकल्स कंपनीच्या शेअर्समध्ये अफाट तेजी पाहायला मिळत आहे. गुरुवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये या कंपनीचे शेअर्स 13 टक्क्यांच्या वाढीसह 1332 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. मागील सहा ट्रेडिंग सेशनमध्ये टाटा केमिकल्स कंपनीच्या शेअर्सची किंमत 36 टक्क्यांनी मजबूत झाली आहे. गुरूवार दिनांक 7 मार्च 2024 रोजी टाटा केमिकल्स स्टॉक 11.30 टक्के वाढीसह 1,311.60 रुपये किमतीवर क्लोज झाले होते. ( टाटा केमिकल्स कंपनी अंश )
नुकताच फिंच रेटिंग फर्मने टाटा केमिकल्स कंपनीचे रेटिंग ‘BB+’ अशी अपग्रेड केली आहे. त्यामुळे टाटा केमिकल्स स्टॉक मजबूत वाढीसह ट्रेड करत आहे. याशिवाय टाटा सन्स कंपनीच्या संभाव्य IPO बाबतच्या चर्चेमुळे देखील टाटा केमिकल्स कंपनीचे शेअर्स मजबूत तेजीत वाढत आहेत.
टाटा केमिकल्स कंपनीच्या मुख्य प्रवर्तक गटात टाटा सन्स देखील सामील आहे. आरबीआयने टाटा सन्स कंपनीला एनबीएफसी म्हणजेच नॉन-बँकिंग वित्तीय कंपनी म्हणून वर्गीकृत केले होते. त्यामुळे टाटा सन्स कंपनीला सप्टेंबर 2025 पर्यंत शेअर बाजारात सूचीबद्ध करणे अनिवार्य झाले आहे.
लेटेस्ट शेअरहोल्डिंग डेटानुसार, टाटा केमिकल्स कंपनीमध्ये टाटा सन्स ही कंपनी मुख्य प्रवर्तक आहे. टाटा सन्स कंपनीने टाटा केमिकल्स कंपनीचे 31.90 टक्के भाग भांडवल म्हणजेच 8,12,60,095 शेअर्स होल्ड केले आहेत. याशिवाय टाटा केमिकल्स कंपनीच्या प्रवर्तक गटात टाटा इन्व्हेस्टमेंट, व्होल्टास, टाटा मोटर्स, टायटन कंपनी, टाटा इंडस्ट्रीज, टाटा कॉफी आणि टाटा कंझ्युमर यांसारख्या टाटा समूहाच्या कंपन्यां देखील सामील आहेत. या कंपनीमध्ये सर्व प्रवर्तकांनी एकूण 37.98 टक्के भाग भांडवल धारण केले आहे. तर सार्वजनिक गुंतवणूकदारांचा वाटा 62.02 टक्के आहे.
महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.