7 May 2025 2:46 PM
अँप डाउनलोड

Ashok Leyland Share Price | भरवशाचा अशोक लेलँड शेअर तुफान तेजीत येणार, कंपनीकडून आली मोठी अपडेट

Ashok Leyland Share Price

Ashok Leyland Share Price | हिंदुजा समूहाचा भाग असलेल्या अशोक लेलँड लिमिटेड कंपनीने मागील महिन्यात उत्तर प्रदेश राज्यात इलेक्ट्रिक व्यावसायिक वाहनांचे उत्पादन करणाऱ्या प्रकल्पाचे अनावरण केले आहे. या प्रकल्पाची सुरुवातीची क्षमता 2,500 वाहने बनवण्याची असेल. तर पुढील दहा वर्षात ही क्षमता वार्षिक 5,000 पर्यंत वाढवली जाईल. गुरूवार दिनांक 7 मार्च 2024 रोजी अशोक लेलँड स्टॉक 0.12 टक्के वाढीसह 170.90 रुपये किमतीवर क्लोज झाला होता. ( अशोक लेलँड लिमिटेड कंपनी अंश )

अशोक लेलँड कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी एका निवेदनात म्हंटले आहे की, “अशोक लेलँड कंपनीचे प्राथमिक लक्ष इलेक्ट्रिक बसेसच्या उत्पादनावर आहे. तसेच कंपनीने विद्यमान आणि इतर उदयोन्मुख पर्यायी इंधनांवर चालणारी वाहने तयार करण्याच्या क्षमतेची पडताळणी सुरू केली आहे”. दरम्यान टाटा मोटर्स लिमिटेड कंपनीचे युनिट टीएमएल स्मार्ट सिटी मोबिलिटी सोल्युशन्स कंपनी आर्थिक वर्ष 2025 पर्यंत 3,300 ई-बस रस्त्यावर उतरण्याची तयारी करत आहे.

ओलेक्ट्रा ग्रीनटेक कंपनीने चीनच्या BYD कंपनीसोबत भागीदारी केली आहे. त्यांनी संयुक्तपणे ई-बस प्लांट उभारण्याचा करार केला आहे. या प्लांटमध्ये वाहन उत्पादन जुलै 2024 पर्यंत सुरू होण्याची शक्यता आहे. कंपनीने आर्थिक वर्ष 2025 पर्यंत किमान 2,500 ई-बस वितरित करण्याचे निर्धारित केले आहे. सध्या अशोक लेलँड कंपनीचे शेअर्स 170.90 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत. YTD आधारे अशोक लेलँड कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना 38.12 टक्के परतावा कमावून दिला आहे.

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Ashok Leyland Share Price NSE Live 08 March 2024.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

#Ashok Leyland Share Price(75)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या