6 May 2024 11:56 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
BHEL Share Price | PSU बीएचईएल शेअर्स घसरले, स्टॉक Hold करावा की Sell? तज्ज्ञांनी खुशखबर दिली Suzlon Share Price | शेअर प्राईस 40 रुपये! 4 वर्षात दिला 1623% परतावा, तज्ज्ञांकडून टार्गेट प्राईसबाबत मोठी अपडेट SBI Home Loan | SBI कडून 20 वर्षांसाठी गृहकर्ज घ्यायचं आहे का? महिना EMI आणि व्याज किती लागेल जाणून घ्या IPO GMP | IPO आला रे! पहिल्याच दिवशी लॉटरी लागेल, GMP धुमाकूळ घालतेय, संधी सोडू नका Numerology Horoscope | 06 मे 2024 | तुमची जन्म तारीख किती? अंकज्योतिष शास्त्र सांगेल तुमचा सोमवारचा दिवस कसा असेल Horoscope Today | तुमचे सोमवारचे राशिभविष्य | 06 मे 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा सोमवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या Senior Citizen Saving Scheme | ज्येष्ठ नागरिक सेव्हिंग स्कीम की बँक FD? अधिक फायदा कुठे जाणून घ्या
x

सुविधा हव्या तर पैसे मोजावेच लागतील, आयुष्याभर टोल बंद होणार नाही: गडकरी

Toll Naka, Toll Free, Toll Charges, Minister Nitin Gadkari, Raj Thackeray, MNS, Toll Cha Zoll

नवी दिल्ली : एकीकडे महाराष्ट्रामध्ये भारतीय जनता पक्ष सरकार टोलमुक्तीच्या बाता मारत सत्तेवर आलेले असताना महाराष्ट्राचे खासदार आणि भारतीय जनता पक्षाचे वरिष्ठ नेते नितीन गडकरी यांनी आज लोकसभेत याबाबत मोठे वक्तव्य केले आहे. लोकांना चांगल्या सुविधा हव्या असतील तर पैसे मोजावेच लागतील, असे सांगितले आहे.

दरम्यान, देशातील विविध भागात टोल वसुलीवरून काही खासदारांनी विचारलेल्या प्रश्नाला गडकरी यांनी आज लोकसभेत उत्तर दिले. यावेळी त्यांनी ज्या भागातील जनतेची टोल देण्याची क्षमता आहे त्या भागातच टोल वसुली केली जाते. या पैशांतून ग्रामीण आणि डोंगराळ भागात रस्ते बांधले जात असल्याचे ते म्हणाले.

सरकारकडे विकासकामांसाठी हवा असलेला पैसा नाही. पाच वर्षांत देशात ४० हजार किलोमीटरचे राज्यमार्ग तयार करण्यात आले आहेत. चांगले रस्ते हवे असतील तर टोल द्यावाच लागणार. टोल उभ्या आयुष्यात बंद होऊ शकणार नाही, मात्र, गरजेनुसार थोडा कमी-जास्त होऊ शकतो, असे गडकरी म्हणाले.

दरम्यान, गडकरी यांनी सोमवारी वाहन कायद्यात बदल केले आहेत. या विधेयकामध्ये लहान मुलांसाठी आणखी दोन नियम करण्यात आले आहेत. कारमध्ये बुस्टर सीट लावावी लागणार आहे. मागील सीटवर बसल्यास हा नियम लागू होणार आहे. मागील सीटवर बुस्टर किंवा चाईल्ड सीट लावता येते ज्यामध्ये लहान मुलाला बसवून त्याला सीटबेल्ट लावता येणार आहे. यामुळे अचानक ब्रेकिंग किंवा अपघात झाल्यास मुलाला मार बसण्याची शक्यता कमी होईल. तसेच ४ वर्षांपेक्षा मोठ्या मुलांसाठी बाईकवरून जाताना हल्मेट घालावे लागणार आहे.

हॅशटॅग्स

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x