
Titagarh Rail Share Price | टीटागढ रेल सिस्टीम कंपनीला नुकताच एक मोठी वर्क ऑर्डर मिळाली आहे. त्यामुळे कंपनीचे शेअर्स तेजीत आले होते. मागील एका वर्षात टिटागड रेल सिस्टिम कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना मजबूत परतावा कमावून दिला आहे. गुरूवार दिनांक 7 मार्च 2024 रोजी टीटागढ रेल सिस्टीम कंपनीचे शेअर्स 0.73 टक्के वाढीसह 898.80 रुपये किमतीवर क्लोज झाले होते. ( टीटागढ रेल सिस्टीम कंपनी अंश )
7 मार्च 2024 रोजी स्टॉक एक्स्चेंजला दिलेल्या माहितीत टीटागढ रेल सिस्टीम कंपनीने कळवले होते की, त्यांना भारतीय रेल्वे मंत्रालयाकडून 1909 कोटी रुपये मूल्याची ऑर्डर मिळाली आहे. या ऑर्डर अंतर्गत कंपनीला 4463 वॅगनचा पुरवठा करायचा आहे. टीटागढ रेल सिस्टम्स कंपनीने 2023 मध्ये आपल्या गुंतवणूकदारांना 50 पैसे प्रति शेअर लाभांश देखील वाटप केला होता. 2019 मध्ये देखील या कंपनीने गुंतवणुकदारांना 30 पैसे प्रति शेअर लाभांश वाटप केला होता.
गुरुवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये टीटागढ रेल सिस्टीम कंपनीचे शेअर्स 899.20 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. मागील एका वर्षभरात टीटागढ रेल सिस्टीम कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना 223 टक्के परतावा कमावून दिला आहे.
मागील 6 महिन्यांत या कंपनीच्या शेअरमध्ये फक्त 13.7 टक्क्यांची वाढ पाहायला मिळाली आहे. या कंपनीच्या शेअर्सची 52 आठवड्यांची उच्चांक किंमत पातळी 1249 रुपये होती. तर नीचांकी किंमत पातळी 223.30 रुपये होती. टीटागढ रेल सिस्टीम कंपनीचे एकूण बाजार भांडवल 12,109.87 कोटी रुपये आहे.
महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.