9 May 2024 5:27 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Numerology Horoscope | 09 मे 2024 | तुमची जन्म तारीख किती? अंकज्योतिष शास्त्र सांगेल तुमचा गुरुवारचा दिवस कसा असेल Horoscope Today | तुमचे गुरुवारचे राशिभविष्य | 09 मे 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा गुरुवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या South Indian Bank Share Price | शेअर प्राईस 27 रुपये! स्टॉकमध्ये मजबूत ब्रेकआउट, लवकरच मोठा परतावा देईल Gold Rate Today | खुशखबर! आज अक्षय्य तृतीयेच्या 2 दिवस आधी सोन्याचा भाव धडाम झाला, नवे दर तपासून घ्या Sterling and Wilson Share Price | कंपनीत रिलायन्स ग्रुपचा हिस्सा! 1 महिन्यात दिला 41% परतावा, स्टॉक अप्पर सर्किटवर JP Associates Share Price | शेअर प्राईस रु.17, जेपी असोसिएट्स कंपनीबाबत चिंता वाढवणारी अपडेट, स्टॉक Sell करावा? Yes Bank Share Price | येस बँकेबाबत नवीन अपडेट आली, थेट शेअर्सला किती फायदा होणार? स्टॉक Buy करावा?
x

Gensol Engineering Share Price | अवघ्या 3 दिवसात 15% परतावा देणाऱ्या शेअरची दिग्गज बिग-बुल कडूनही खरेदी

Gensol Engineering Share Price

Gensol Engineering Share Price | जेनसोल इंजीनियरिंग कंपनीच्या शेअर्समध्ये जबरदस्त तेजी पाहायला मिळत आहे. कालच्या ट्रेडिंग सेशनमध्ये या कंपनीचे शेअर्स 5 टक्के अप्पर सर्किटमध्ये अडकले होते. आज देखील या स्टॉकमध्ये जोरदार खरेदी सुरू आहे. ( जेनसोल इंजीनियरिंग कंपनी अंश )

मागील तीन ट्रेडिंग सेशनपासून या कंपनीचे शेअर्स हिरव्या निशाणीवर ट्रेड करत आहेत. अवघ्या तीन दिवसात जेनसोल इंजीनियरिंग लिमिटेड कंपनीचे शेअर्स 15.5 टक्के वाढले आहेत. आज गुरूवार दिनांक 21 मार्च 2024 रोजी जेनसोल इंजीनियरिंग लिमिटेड कंपनीचे शेअर्स 1.08 टक्के वाढीसह 890.75 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.

नुकताच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारतातील एक कोटी घरांच्या छतावर सोलर पॅनल बसवून सौर ऊर्जा निर्माण करण्याची घोषणा केली होती. तेव्हापासून जेनसोल इंजीनियरिंग लिमिटेड कंपनीच्या शेअर्समध्ये उलाढाल पाहायला मिळत आहे. जेनसोल इंजिनिअरिंग ही कंपनी मुख्यतः सौर ऊर्जा अभियांत्रिकी, खरेदी आणि बांधकाम संबंधित सेवा प्रदान करण्याचा व्यवसाय करते. जेनसोल इंजीनियरिंग लिमिटेड कंपनीने नुकताच गुजरात राज्यात भावनगर येथे कॉन्टिनम ग्रीन एनर्जीसाठी करार केल्याची माहिती जाहीर केली आहे.

शेअर बाजारातील दिग्गज गुंतवणूकदार मुकुल अग्रवाल यांनी जेनसोल इंजीनियरिंग लिमिटेड कंपनीमध्ये मोठा हिस्सा होल्ड केला आहे. मुकुल अग्रवाल यांच्या पोर्टफोलिओमध्ये जेनसोल इंजीनियरिंग लिमिटेड कंपनीचे 1.5 टक्के भाग भांडवल आहे. या कंपनीच्या ऑर्डर बूकचा आकार 1000 कोटीपेक्षा जास्त आहे.

मागील पाच दिवसांत जेनसोल इंजीनियरिंग लिमिटेड कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना 12 टक्के परतावा कमावून दिला आहे. मागील एका महिन्यात या कंपनीच्या शेअर्सची किंमत 33 टक्के वाढली होती. मात्र मागील सहा महिन्यांत या कंपनीच्या शेअर्समध्ये 53 टक्के घसरण पहायला मिळाली होती.

YTD आधारे हा स्टॉक फक्त 4 टक्के मजबूत झाला आहे. जेनसोल इंजीनियरिंग लिमिटेड कंपनीच्या शेअर्सची 52 आठवड्यांची उच्चांक किंमत पातळी 1,377.10 रुपये होती. तर नीचांक किंमत पातळी 283.38 रुपये होती. या कंपनीचे एकूण बाजार भांडवल 3,340.77 कोटी रुपये आहे.

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Gensol Engineering Share Price NSE Live 21 March 2024.

हॅशटॅग्स

#Gensol Engineering Share Price(16)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x