15 May 2024 6:08 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Praj Industries Share Price | अशी संधी सोडू नका! फटाफट 50% परतावा मिळेल, तज्ज्ञांचा स्टॉक खरेदीचा सल्ला Triveni Turbine Share Price | 97 रुपयाच्या शेअरची कमाल! 3 वर्षात 470% परतावा दिला, शेअर अप्पर सर्किट हिट करतोय RVNL Share Price | RVNL कंपनीबाबत फायद्याची अपडेट, रेल्वे स्टॉक बुलेट ट्रेनच्या वेगाने परतावा देणार HAL Share Price | PSU स्टॉक HAL सुसाट तेजीत परतावा देणार, परतावा पाहून खरेदीला ऑनलाईन गर्दी Horoscope Today | तुमचे गुरुवारचे राशिभविष्य | 16 मे 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा गुरुवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या Tata Power Share Price | तज्ज्ञांकडून टाटा पॉवर शेअर्ससाठी 'बाय' रेटिंग, पुढची टार्गेट प्राईस केली जाहीर Sakuma Share Price | श्रीमंत बनवणाऱ्या 27 रुपयाच्या शेअरवर तुटून पडले गुंतवणूकदार, यापूर्वी दिला 700% परतावा
x

IRB Infra Share Price | अवघ्या 6 महिन्यात 100% परतावा देणारा IRB इन्फ्रा शेअर खरेदीचा सल्ला, पुढची टार्गेट प्राईस जाहीर

IRB Infra Share Price

IRB Infra Share Price | आयआरबी इन्फ्रा कंपनीचे शेअर्स गुरुवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये प्रचंड तेजीसह व्यवहार करत होते. तर आज देखील या कंपनीच्या शेअर्समध्ये जोरदार खरेदी पाहायला मिळत आहे. या कंपनीचे शेअर्स कालच्या ट्रेडिंग सेशनमध्ये सुरुवातीच्या काही तासात 10 टक्के वाढीसह 59.25 रुपये या आपल्या इंट्राडे उच्चांक किंमत पातळीवर पोहोचले होते. ( आयआरबी इन्फ्रा कंपनी अंश )

या स्टॉकमध्ये वाढ होण्याचे मुख्य कारण म्हणजे, देशांतर्गत ब्रोकरेज फर्म कोटक सिक्युरिटीजने या स्टॉकची रेटिंग अपग्रेड केली आहे. आज शुक्रवार दिनांक 22 मार्च 2024 रोजी आयआरबी इन्फ्रा स्टॉक 1.02 टक्के वाढीसह 59.50 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.

नुकताच कोटक सिक्युरिटीज फर्मने आपला एक अहवाल जाहीर करून आयआरबी इन्फ्रा स्टॉकची रेटिंग अपग्रेड केली होती. कोटक इन्स्टिट्यूशनल इक्विटीज फर्मच्या तज्ञांनी या स्टॉकची टार्गेट प्राइस 60 रुपयेवरून वाढवून 65 रुपये केली आहे. तसेच या स्टॉकची रेटिंग ‘सेल’ वरून ‘Buy’ केली आहे.

तज्ञांच्या मते, आर्थिक वर्ष 2024 मध्ये आयआरबी इन्फ्रा कंपनीकडे 44,400 कोटी रुपये मूल्याच्या ऑर्डर्स प्रलंबित आहेत. नुकताच स्पॅनिश पायाभूत सुविधा क्षेत्रातील दिग्गज कंपनी Ferrovial ची उपकंपनी असलेल्या Cintra ने IRB इन्फ्रास्ट्रक्चर ट्रस्टचे 24 टक्के भागभांडवल खरेदी करून मोठी गुंतवणूक केल्याची माहिती दिली आहे.

मागील सहा महिन्यांत आयआरबी इन्फ्रा कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणूकदारांना 100 टक्केपेक्षा जास्त परतावा कमावून दिला आहे. या काळात कंपनीचे शेअर्स 29 रुपयेवरून वाढून सध्याच्या किमतीवर पोहचले होते. मागील 1 वर्षात आयआरबी इन्फ्रा कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणूकदारांचे पैसे 132 टक्केपेक्षा जास्त वाढवले आहेत.

या स्टॉकने निफ्टीपेक्षा चांगला परतावा दिला आहे, कारण या काळात निफ्टी निर्देशांक फक्त 29 टक्के वाढला आहे. ट्रेंडलाइन डेटानुसार, IRB इन्फ्रास्ट्रक्चर स्टॉक आपल्या 200-दिवसांच्या SMA किंमत पातळीच्या वर आणि 50-दिवसांच्या मूव्हिंग ॲव्हरेज किंमत पातळीच्या खाली ट्रेड करत आहे.

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | IRB Infra Share Price NSE Live 22 March 2024.

हॅशटॅग्स

IRB infra Share Price(8)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x