 
						Tata Elxsi Share Price | टाटा समूहाचा भाग असलेल्या टाटा एलेक्सी या आयटी कंपनीच्या शेअर्समध्ये जबरदस्त उलाढाल पाहायला मिळत आहे. या मिडकॅप स्टॉकमध्ये सध्या मजबूत वाढीचे संकेत मिळत आहेत. मागील आठवड्यात शुक्रवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये टाटा एलेक्सी कंपनीचे 7,665 रुपये किमतीवर क्लोज झाले होते. ब्रोकरेज हाऊस प्रभुदास लिलाधर फर्मच्या तज्ञांच्या मते, हा कंपनीचे शेअर्स पुढील काळात 8,900 ते 9,000 रुपये किमतीवर जाऊ शकतात. ( टाटा एलेक्सी कंपनी अंश )
आज मंगळवार दिनांक 26 मार्च 2024 रोजी या कंपनीचे शेअर्स 0.40 टक्के घसरणीसह 7,634.40 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत. टाटा एलेक्सी कंपनीचे एकूण बाजार भांडवल 47,727.73 कोटी रुपये आहे. या मिडकॅप स्टॉकची 52 आठवड्यांची उच्चांक किंमत पातळी 9,191.10 रुपये होती. तर नीचांक किंमत पातळी 5,883.05 रुपये होती. 18 मार्च ते 23 मार्च दरम्यान टाटा एलेक्सी कंपनीचे शेअर्स एक टक्के घसरले होते.
प्रभुदास लिलाधर फर्मच्या तज्ञांच्या मते, टाटा एलेक्सी स्टॉक मागील काही काळापासून 7400 रुपये ते 7900 रुपये दरम्यान कन्सोलिडेशनच्या टप्प्यात ट्रेड करत आहे. या स्टॉकमध्ये 7350 रुपये किमतीवर मजबूत सपोर्ट पाहायला मिळत आहे. ब्रोकरेज हाऊसच्या मते, या कंपनीचे शेअर्स 7840 रुपये या 50 दिवसाच्या EMA झोनजवळ प्रतिकार देत आहेत. तर या कंपनीचे शेअर्स 7760 रुपये या आपल्या महत्त्वाच्या 200 दिवसाच्या DMA जवळ ट्रेड करत आहेत.
ब्रोकरेज हाऊसच्या मते, टाटा एलेक्सी कंपनीचे शेअर्स पुढील काळात 8600-9000 रुपये किमतीवर जाऊ शकतात. तज्ञांनी स्टॉक खरेदी करताना 7200 रुपये किमतीवर स्टॉपलॉस लावण्याचा सल्ला दिला आहे. टाटा एलेक्सी कंपनीने सप्टेंबर 2017 मध्ये आपल्या पात्र गुंतवणूकदारांना 1:1 या प्रमाणात मोफत बोनस शेअर्स वाटप केले होते. मागील एका वर्षात या कंपनीने आपल्या शेअरधारकांना 60.60 रुपये लाभांश देखील वाटप केला आहे. या कंपनीच्या शेअर्सचे लाभांश उत्पन्न प्रमाण 0.8 टक्के आहे.
टाटा एलेक्सी कंपनीने आर्थिक वर्ष 2023-24 च्या डिसेंबर तिमाहीत 206.4 कोटी रुपये निव्वळ नफा कमावला होता. या कंपनीचा ऑपरेशनल महसूल तिमाही-दर-तिमाही आधारे 3.7 टक्के वाढला आहे. वर्ष-दर-वर्ष आधारे कंपनीचा महसूल 11.8 टक्के वाढून 914.2 कोटी नोंदवला गेला आहे.
महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
 
                 
		 
		 
		 
		 
		 
		 
		 
		 
		 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
		 
		 
		 
		 
		 
		 
		 
		