
Multibagger Stocks | आर्थिक वर्ष 2023-24 मध्ये शेअर बाजारातील अनेक सूचीबद्ध कंपन्यांच्या शेअर्सने जबरदस्त कामगिरी केली होती. आता नवीन आर्थिक वर्षाची सुरुवात होणार आहे. याकाळात अनेक गुंतवणुकदार शेअर बाजारात पैसे लावण्यास उत्सुक असतील.
गुंतवणूकदारांना पैसे गुंतवण्यास सोयीस्कर व्हावे म्हणून शेअर बाजारातील काही दिग्गज तज्ञांनी टॉप 10 शेअर्सची निवड केली आहे. यातील अनेक शेअर्सनी गुंतवणूकदारांचे पैसे अक्षरशः दुप्पट केले आहे. हे शेअर्स नवीन आर्थिक वर्षात देखील मजबूत परतावा देऊ शकतात. चला तर मग जाणून घेऊ या टॉप 10 स्टॉकची सविस्तर माहिती.
IRFC :
या कंपनीच्या शेअरने आर्थिक वर्ष 2023-24 मध्ये आपल्या गुंतवणुकदारांना 435 टक्के परतावा कमावून दिला आहे. शेअर बाजारातील जवळपास 32 लाख किरकोळ गुंतवणूकदारांनी या कंपनीचे 138 कोटी शेअर्स होल्ड केले आहे. या सर्व शेअर्सचे एकूण मुल्य 19,500 कोटी रुपये आहे. या कंपनीचे एकूण बाजार भांडवल 1.74 लाख कोटी रुपये आहे. गुरूवार दिनांक 28 मार्च 2024 रोजी या कंपनीचे शेअर्स 0.18 टक्के वाढीसह 143.10 रुपये किमतीवर क्लोज झाले होते.
सुझलॉन एनर्जी :
या कंपनीच्या शेअरने आर्थिक वर्ष 2023-24 मध्ये आपल्या गुंतवणुकदारांना 412 टक्के परतावा कमावून दिला आहे. शेअर बाजारातील जवळपास 34 लाख किरकोळ गुंतवणूकदारांनी या कंपनीचे 579 कोटी शेअर्स होल्ड केले आहे. गुरूवार दिनांक 28 मार्च 2024 रोजी या कंपनीचे शेअर्स 4.94 टक्के वाढीसह 40.40 रुपये किमतीवर क्लोज झाले होते.
Zomato :
या कंपनीच्या शेअरने आर्थिक वर्ष 2023-24 मध्ये आपल्या गुंतवणुकदारांना 258 टक्के परतावा कमावून दिला आहे. शेअर बाजारातील जवळपास 17 लाख किरकोळ गुंतवणूकदारांनी या कंपनीचे 63.34 कोटी शेअर्स होल्ड केले आहे. या सर्व शेअर्सचे एकूण मुल्य 11550 कोटी रुपये आहे. गुरूवार दिनांक 28 मार्च 2024 रोजी या कंपनीचे शेअर्स 1.50 टक्के वाढीसह 182.15 रुपये किमतीवर क्लोज झाले होते.
रिलायन्स पॉवर :
या कंपनीच्या शेअरने आर्थिक वर्ष 2023-24 मध्ये आपल्या गुंतवणुकदारांना 184 टक्के परतावा कमावून दिला आहे. शेअर बाजारातील जवळपास 35 लाख किरकोळ गुंतवणूकदारांनी या कंपनीचे 202 कोटी शेअर्स होल्ड केले आहे. या सर्व शेअर्सचे एकूण मुल्य 5711 कोटी रुपये आहे. गुरूवार दिनांक 28 मार्च 2024 रोजी या कंपनीचे शेअर्स 2.17 टक्के वाढीसह 28.25 रुपये किमतीवर क्लोज झाले होते. आर्थिक वर्ष 2023-24 शेवटपर्यंत कंपनीने कर्जमुक्त करण्याचे उद्दिष्ट निर्धारित केले आहे.
जयप्रकाश पॉवर व्हेंचर्स :
या कंपनीच्या शेअरने आर्थिक वर्ष 2023-24 मध्ये आपल्या गुंतवणुकदारांना 175 टक्के परतावा कमावून दिला आहे. शेअर बाजारातील जवळपास 17.55 लाख किरकोळ गुंतवणूकदारांनी या कंपनीचे 3.915 कोटी शेअर्स होल्ड केले आहे. या सर्व शेअर्सचे एकूण मुल्य 256 कोटी रुपये आहे. गुरूवार दिनांक 28 मार्च 2024 रोजी या कंपनीचे शेअर्स 1.32 टक्के वाढीसह 15.30 रुपये किमतीवर क्लोज झाले होते.
पंजाब नॅशनल बँक :
या कंपनीच्या शेअरने आर्थिक वर्ष 2023-24 मध्ये आपल्या गुंतवणुकदारांना 166 टक्के परतावा कमावून दिला आहे. शेअर बाजारातील जवळपास 21.30 लाख किरकोळ गुंतवणूकदारांनी या कंपनीचे 96.46 कोटी शेअर्स होल्ड केले आहे. या सर्व शेअर्सचे एकूण मुल्य 12000 कोटी रुपये आहे. गुरूवार दिनांक 28 मार्च 2024 रोजी या कंपनीचे शेअर्स 1.34 टक्के वाढीसह 124.40 रुपये किमतीवर क्लोज झाले होते.
टाटा मोटर्स :
या कंपनीच्या शेअरने आर्थिक वर्ष 2023-24 मध्ये आपल्या गुंतवणुकदारांना 136 टक्के परतावा कमावून दिला आहे. शेअर बाजारातील जवळपास 41 लाख किरकोळ गुंतवणूकदारांनी या कंपनीचे 51.33 कोटी शेअर्स होल्ड केले आहे. या सर्व शेअर्सचे एकूण मुल्य 50972 कोटी रुपये आहे. गुरूवार दिनांक 28 मार्च 2024 रोजी या कंपनीचे शेअर्स 1.67 टक्के वाढीसह 995 रुपये किमतीवर क्लोज झाले होते.
व्होडाफोन आयडिया :
या कंपनीच्या शेअरने आर्थिक वर्ष 2023-24 मध्ये आपल्या गुंतवणुकदारांना 128 टक्के परतावा कमावून दिला आहे. शेअर बाजारातील जवळपास 31 लाख किरकोळ गुंतवणूकदारांनी या कंपनीचे 436.54 कोटी शेअर्स होल्ड केले आहे. या सर्व शेअर्सचे एकूण मुल्य 6044 कोटी रुपये आहे. गुरूवार दिनांक 28 मार्च 2024 रोजी या कंपनीचे शेअर्स 13.30 रुपये किमतीवर क्लोज झाले होते.
इंडियन ऑइल कॉर्प :
या कंपनीच्या शेअरने आर्थिक वर्ष 2023-24 मध्ये आपल्या गुंतवणुकदारांना 115 टक्के परतावा कमावून दिला आहे. शेअर बाजारातील जवळपास 20.32 लाख किरकोळ गुंतवणूकदारांनी या कंपनीचे 95.30 कोटी शेअर्स होल्ड केले आहे. या सर्व शेअर्सचे एकूण मुल्य 16000 कोटी रुपये आहे. गुरूवार दिनांक 28 मार्च 2024 रोजी या कंपनीचे शेअर्स 1.08 टक्के वाढीसह 168 रुपये किमतीवर क्लोज झाले होते.
टाटा पॉवर कंपनी :
या कंपनीच्या शेअरने आर्थिक वर्ष 2023-24 मध्ये आपल्या गुंतवणुकदारांना 107 टक्के परतावा कमावून दिला आहे. शेअर बाजारातील जवळपास 39.28 लाख किरकोळ गुंतवणूकदारांनी या कंपनीचे 75.52 कोटी शेअर्स होल्ड केले आहे. या सर्व शेअर्सचे एकूण मुल्य 30000 कोटी रुपये आहे. गुरूवार दिनांक 28 मार्च 2024 रोजी या कंपनीचे शेअर्स 1.70 टक्के वाढीसह 395 रुपये किमतीवर क्लोज झाले होते.
महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.