19 May 2024 11:01 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
HDFC Mutual Fund | पगारदारांनो! या फंडात SIP बचत करा, अवघ्या 5 वर्षात मिळेल 50 लाख रुपये परतावा Horoscope Today | तुमचे रविवारचे राशिभविष्य | 19 मे 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा रविवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या BEL Share Price | तज्ज्ञांकडून PSU BEL शेअरला 'BUY' रेटिंग, यापूर्वी दिला 700% परतावा, खरेदीला ऑनलाईन गर्दी Bonus Shares | पटापट मल्टिबॅगर परतावा देतोय हा शेअर, फ्री बोनस शेअर्स जाहीर, संधी सोडू नका Mazagon Dock Share Price | माझगाव डॉक स्टॉक चार्टवर तेजीचे संकेत, तज्ज्ञांकडून 'BUY' रेटिंग, यापूर्वी 245% परतावा दिला Malavya Raj Yog | मालव्य राजयोग 'या' 5 राशींच्या लोकांना मालामाल करणार, लाभस्थानी शुक्र ठरणार वरदान Titagarh Rail Systems Share Price | तज्ज्ञांकडून स्टॉकला 'Hold' रेटिंग, अल्पावधीत देणार 22% परतावा, खरेदीला गर्दी
x

HAL Share Price | सरकारी कंपनी HAL शेअर्समध्ये तेजी पाहून गुंतवणुकदार उत्साही, ऑर्डरबुक मजबूत होताच खरेदी वाढली

HAL Share Price

HAL Share Price | हिंदुस्तान एरोनॉटिक्स या संरक्षण क्षेत्रात व्यवसाय करणाऱ्या सरकारी कंपनीच्या शेअर्समध्ये जबरदस्त तेजी पाहायला मिळत आहे. नुकताच एचएएल कंपनीला कोचीन शिपयार्ड कंपनीने 1173.42 कोटी रुपये मूल्याची एक ऑर्डर दिली आहे. ( हिंदुस्तान एरोनॉटिक्स कंपनी अंश )

एचएएल कंपनी कोचीन शिपयार्ड कंपनीला भारतीय नौदलाच्या नेक्स्ट जनरेशन मिसाईल व्हेसेल प्रकल्पाकरता LM 2500 गॅस टर्बाइन आणि GT स्पेअर्स, टूल्सचे 6 संच पुरवणार आहे. या ऑर्डरची पूर्तता 2026 ते 2029 दरम्यान करायची आहे. आज मंगळवार दिनांक 2 एप्रिल 2024 रोजी एचएएल स्टॉक 3.78 टक्के वाढीसह 3,532 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.

कालपासून नवीन आर्थिक वर्षाची सुरुवात झाली आहे. आणि शेअर बाजाराने पहिल्या दिवशी जोरदार तेजी नोंदवून गुंतवणुकदारांना खुश केले होते. एचएएल स्टॉकमध्ये देखील मोठ्या प्रमाणात खरेदी पाहायला मिळाली होती. कालच्या ट्रेडिंग सेशनमध्ये हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड कंपनीचे शेअर्स 3,454.35 रुपये या आपल्या 52 आठवड्यांच्या उच्चांक किंमत पातळीवर पोहचले होते.

एचएएल कंपनीच्या महसुल संकलनात 11 टक्क्यांची वाढ पाहायला मिळाली आहे. या कंपनीने आर्थिक वर्ष 2023-24 मध्ये 29,810 कोटी रुपये हा सर्वाधिक महसूल संकलित केला होता. मागील वर्षीच्या तुलनेत कंपनीच्या महसूल संकलनात 11 टक्के वाढ पाहायला मिळाली होती.

31 मार्च 2024 पर्यंत एचएएल कंपनीच्या ऑर्डर बुकचा आकार 94000 कोटी होता. मार्च 2024 ला संपलेल्या आर्थिक वर्षात या कंपनीने 19,000 कोटी रुपयेपेक्षा जास्त किमतीच्या ऑर्डर प्राप्त केल्या होत्या. यासोबतच कंपनीला 16,000 कोटी रुपयेपेक्षा जास्त मूल्याच्या दुरुस्ती संबंधित ऑर्डर्स देखील मिळाल्या आहेत. नवीन आर्थिक वर्ष 2024-25 मध्ये देखील या कंपनीला मोठ्या ऑर्डर मिळण्याची अपेक्षा आहे.

एचएएल कंपनीने आर्थिक वर्ष 2024 मध्ये एचएएल कंपनीला गयाना देशाच्या संरक्षण दलांकडून दोन हिंदुस्तान 228 विमानांचा पुरवठा करण्याची ऑर्डर मिळाली होती. या ऑर्डर करारावर स्वाक्षरी केल्यानंतर अवघ्या एका महिन्यात दोन्ही विमानांचा पुरवठा करण्यात आला आहे. या कंपनीने 2024 मध्ये LCA Mk-1A ची पहिली सीरिजच्या लढाऊ विमानाचे उत्पादन करून महत्त्वपूर्ण यश साध्य केले आहे.

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | HAL Share Price NSE Live 02 April 2024.

हॅशटॅग्स

#HAL Share Price(23)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x