 
						IREDA Share Price | आयआरईडीए म्हणजेच इंडियन रिन्यूएबल एनर्जी डेव्हलपमेंट एजन्सी लिमिटेड या सरकारी कंपनीच्या शेअर्समध्ये जबरदस्त तेजी पाहायला मिळत आहे. कालच्या ट्रेडिंग सेशनमध्ये या कंपनीचे शेअर्स 5 टक्के अप्पर सर्किटसह 149.75 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. तर आज देखील हा स्टॉक अप्पर सर्किटमध्ये अडकला आहे. ( इंडियन रिन्यूएबल एनर्जी डेव्हलपमेंट एजन्सी लिमिटेड कंपनी अंश )
नुकताच या कंपनीने दिलेल्या माहितीनुसार एप्रिल 2023 ते मार्च 2024 या आर्थिक वर्षात कंपनीने सर्वाधिक कर्जे वितरित केले आहे. या काळात कंपनीने 37,354 कोटी रुपये कर्ज वितरीत केल्याची माहिती दिली आहे. आज बुधवार दिनांक 3 एप्रिल 2024 रोजी आयआरईडीए स्टॉक 4.97 टक्के वाढीसह 157.20 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.
मागील आर्थिक वर्षात या कंपनीने 32,587 कोटी रुपये वितरीत केले होते, या तुलनेत 2023-2024 मध्ये कंपनीने 14.63 टक्के जास्त कर्ज वितरीत केले आहे. 31 मार्च 2024 रोजी संपलेल्या तिमाहीमध्ये आयआरईडीए कंपनीने 23,796 कोटी रुपये कर्ज मंजूर केले होते. मागील वर्षीच्या याच तिमाहीत कंपनीने 11,797 कोटी रुपये कर्ज मंजूर केले होत, म्हणजेच मागील वर्षीच्या तुलनेत कंपनीच्या कर्ज वितरणात दुप्पट वाढ झाली आहे.
आर्थिक वर्ष 2023-24 मध्ये कंपनीच्या एकूण थकित कर्जाचे मूल्य 59,650 कोटी रुपये होते. तर 2022-23 मधील कंपनीच्या थकीत कर्जाचे मूल्य 47,076 कोटी रुपये होते. म्हणजेच थकीत कर्जात 26.71 टक्के वाढ नोंदवली गेली आहे. आर्थिक वर्ष 2023-24 च्या डिसेंबर तिमाहीत कंपनीने 67 टक्के वाढीसह 335.54 कोटी रुपये PAT नोंदवला होता.
आयआरईडीए कंपनीचा IPO 32 रुपये किमतीवर लाँच करण्यात आला होता. त्यानंतर हा शेअर 56 टक्के प्रीमियम वाढीसह शेअर बाजारात सूचीबद्ध झाला होता. मागील सहा महिन्यांत या कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना 150 टक्के परतावा कमावून दिला आहे. याकाळात निफ्टी 50 इंडेक्स 15 टक्क्यांनी वाढले होते.
महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
 
                 
		 
		 
		 
		 
		 
		 
		 
		 
		 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
		 
		 
		 
		 
		 
		 
		