
Zen Technologies Share Price| झेन टेक्नॉलॉजी या ड्रोन उत्पादक कंपनीच्या शेअर्समध्ये मजबूत तेजी पाहायला मिळत आहे. बुधवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये या कंपनीचे शेअर्स 5 टक्के वाढीसह 992 रुपये किमतीवर ओपन झाले होते. त्यानंतर काही तासात हा स्टॉक 1,042.45 रुपये किमतीवर पोहचला होता. ( झेन टेक्नॉलॉजी कंपनी अंश )
मागील पाच दिवसात या कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना 16.38 टक्के परतावा कमावून दिला आहे. 4 मार्च रोजी या कंपनीचे शेअर्स 1,042.45 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. आज गुरूवार दिनांक 4 एप्रिल 2024 रोजी झेन टेक्नॉलॉजी स्टॉक 2.54 टक्के वाढीसह 1,038.10 रुपये किमतीवर ट्रेड करत आहे.
मागील सहा महिन्यांत झेन टेक्नॉलॉजी कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणूकदारांना 39.13 टक्के नफा कमावून दिला आहे. 3 ऑक्टोबर 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 749.25 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. 2024 या वर्षाच्या सुरुवातीपासून आतापर्यंत झेन टेक्नॉलॉजी कंपनीच्या शेअर्सने 31.96 टक्के परतावा कमावून दिला आहे. मागील एका वर्षात या कंपनीच्या शेअर्सने आपल्या शेअरधारकांचे पैसे 207 टक्क्यांनी वाढवले आहेत. 3 एप्रिल 2023 रोजी झेन टेक्नॉलॉजी स्टॉक 338.55 रुपये किमतीवर ट्रेड करत होता.
मागील 5 वर्षांत या कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणूकदारांना अफाट कमाई करून दिली आहे. 5 एप्रिल 2019 रोजी या कंपनीचे शेअर्स 75 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. आता हा स्टॉक 1038 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत. याकाळात कंपनीचे शेअर्स 1,286.24 टक्के वाढले आहेत. जर तुम्ही 5 वर्षांपूर्वी झेन टेक्नॉलॉजी कंपनीच्या शेअर्समध्ये 1 लाख रुपये लावले असते तर आज तुमच्या गुंतवणुकीचे मूल्य 13 लाख रुपये झाले असते.
महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.