16 May 2024 8:29 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Horoscope Today | तुमचे शुक्रवारचे राशिभविष्य | 17 मे 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा शुक्रवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या Zen Technologies Share Price | हा स्टॉक खरेदी करा, अवघ्या 4 वर्षात 1252% परतावा दिला, ऑर्डरबुक अजून मजबूत झाली Tata Motors Share Price | टाटा मोटर्स शेअरला टेक्निकल सेटअपवर मजबूत सपोर्ट, मोठ्या कमाईसाठी तयार राहा Vedanta Share Price | वेदांता स्टॉक पैसे झटपट दुप्पट करू शकतो, तज्ज्ञांकडून 'BUY' रेटिंग, कमाईची मोठी संधी Adani Power Share Price | अदानी पॉवर स्टॉक चार्टवर तेजीचे संकेत, 'या' स्टॉक प्राईसच्या पार गेल्यास मोठा परतावा Sterling and Wilson Share Price | कंपनीत रिलायन्सची हिस्सेदारी, 6 महिन्यात 156% परतावा, तज्ज्ञांकडून 'बाय' रेटिंग PSU Stocks | सरकारी कंपनी फ्री बोनस शेअर्सचा पाऊस पाडतेय, गुंतवणुकीची संधी सोडू नका
x

IREDA Share Price | IREDA शेअरला 'या' किमतीवर मजबूत सपोर्ट, सरकारी स्टॉक तेजीत येणार, टार्गेट प्राईस जाणून घ्या

IREDA Share Price

IREDA Share Price | आयआरईडीए म्हणजेच इंडियन रिन्युएबल एनर्जी डेव्हलपमेंट एजन्सी या स्सरकरी कंपनीच्या शेअर्समध्ये मजबूत उलाढाल पाहायला मिळत आहे. मागील आठवड्यात शुक्रवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये या कंपनीचे शेअर्स 14 टक्के वाढीसह 181.15 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. ( इंडियन रिन्युएबल एनर्जी डेव्हलपमेंट एजन्सी कंपनी अंश )

मागील पाच ट्रेडिंग सेशनमध्ये या सरकारी कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणुकदारांना 30 टक्के परतावा कमावून दिला आहे. या कंपनीच्या शेअर्सची 52 आठवड्यांची उच्चांक किंमत पातळी 215 रुपये होती. आज मंगळवार दिनांक 9 एप्रिल 2024 रोजी आयआरईडीए स्टॉक 2.24 टक्के घसरणीसह 170.40 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.

या कंपनीच्या शेअरमध्ये वाढ होण्याचे मुख्य कारण म्हणजे, कंपनीने आर्थिक वर्ष 2023-24 मध्ये आतापर्यंतची सर्वाधिक म्हणजेच 37,354 कोटी रुपये मूल्याची कर्ज मंजूरी नोंदवली आहे. यासह मागील एका आर्थिक वर्षात या सरकारी कंपनीने 25,089 कोटी रुपये मूल्याचे कर्जे वितरित केले आहेत. आर्थिक वर्ष 2022-23 मध्ये कंपनीने 47,076 कोटी रुपये कर्जे वितरित केले होते.

ब्रोकरेज फर्मच्या मते, आयआरईडीए कंपनीचे शेअर्स पुन्हा एकदा सर्वकालीन उच्चांक किंमत गाठू शकतात. तज्ञांनी या स्टॉकवर 185 रुपये टार्गेट प्राइस आणि 170 रुपये स्टॉपलॉस जाहीर केला आहे. मागील काही काळात या कंपनीचे शेअर्स 215 रुपये किंमत स्पर्श करून पुन्हा खाली आले होते. आता हा शेअर पुन्हा 215 रुपयेपर्यंत जाण्याची शक्यता आहे. तज्ञांच्या मते, या स्टॉकमध्ये 155 रुपये किमतीवर सपोर्ट पाहायला मिळत आहे.

आनंद राठी शेअर्स अँड स्टॉक ब्रोकर्स फर्मच्या तज्ञांच्या मते, आयआरईडीए स्टॉकमध्ये 168 रुपये किमतीवर सपोर्ट पाहायला मिळत आहे. आणि 168 रुपये किमतीवर रेझिस्टन्स पाहायला मिळत आहे. हा स्टॉक पुढील काळात 186 रुपये किमतीवर जाण्याची शक्यता आहे. जर हा स्टॉक 186 रुपये किमतीवर पोहचला, तर पुढील टार्गेट 199 रुपये असेल. पुढील महिन्यासाठी या स्टॉकची ट्रेडिंग रेंज 160 रुपये ते 200 रुपये दरम्यान असेल. आयआरईडीए ही कंपनी नवीकरणीय ऊर्जा मंत्रालयाच्या प्रशासकीय नियंत्रणाखालील व्यवसाय करणारी मिनीरत्न दर्जा असलेली कंपनी आहे. या कंपनीचा IPO मागील वर्षी 32 रुपये किमतीवर लाँच करण्यात आला होता.

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | IREDA Share Price NSE Live 09 April 2024.

हॅशटॅग्स

IREDA Share Price(37)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x