
Tanla Share Price | तान्ला प्लॅटफॉर्म्स लिमिटेड कंपनीच्या शेअर्समध्ये मजबूत वाढ पाहायला मिळत आहे. मागील एका वर्षात या कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना 75.02 टक्के परतावा कमावून दिला आहे. बुधवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये या कंपनीचे शेअर्स 12.43 टक्क्यांच्या वाढीसह 1,030.90 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. तर आज शुक्रवार दिनांक 12 एप्रिल 2024 रोजी तान्ला प्लॅटफॉर्म्स लिमिटेड कंपनीचे शेअर्स 0.69 टक्के वाढीसह 992.75 रुपये किमतीवर ट्रेड करत आहे. ( तान्ला प्लॅटफॉर्म्स लिमिटेड कंपनी अंश )
तान्ला प्लॅटफॉर्म्स लिमिटेड या कंपनीचे एकूण बाजार भांडवल 13,342.45 कोटी रुपये आहे. टेक्निकल चार्टवर तान्ला प्लॅटफॉर्म्स स्टॉकमध्ये 980 रुपये किमतीवर मजबूत सपोर्ट पाहायला मिळत आहे. एंजल वन फर्मच्या तज्ञांच्या मते, तान्ला प्लॅटफॉर्म कंपनीच्या शेअर्समध्ये मागील काही आठवड्यांत मजबूत ट्रॅक्शन पाहायला मिळाले आहेत. त्यामुळे हा स्टॉक 910 रुपये या ब्रेकडाउन झोनच्या पार गेला आहे. पुढील काळात तान्ला प्लॅटफॉर्म्स लिमिटेड कंपनीचे शेअर्स 1,020-1,030 रुपये किमतीवर जाऊ शकतात.
आनंद राठी शेअर्स अँड स्टॉक ब्रोकर्स फर्मच्या तज्ञांच्या मते, तान्ला प्लॅटफॉर्म्स लिमिटेड कंपनीच्या शेअर्समध्ये 980 रुपये किमतीवर सपोर्ट पाहायला मिळत आहे. आणि 1050 रुपये किमतीवर रेझिस्टन्स पाहायला मिळत आहे. जर हा स्टॉक 1,050 रुपये किमतीच्या पार गेला तर अल्पावधीत शेअर 1,100 रुपये किमतीवर जाऊ शकतो. पुढील एका महिन्यासाठी या कंपनीच्या शेअर्सची अपेक्षित ट्रेडिंग रेंज 950 रुपये ते 1,125 रुपये दरम्यान असेल.
Tips 2 trades फर्मच्या तज्ञांच्या मते, तान्ला प्लॅटफॉर्म्स लिमिटेड कंपनीच्या स्टॉकची किंमत दैनंदिन चार्टवर तेजीचे संकेत देत आहे. या स्टॉकमध्ये 920 रुपये किमतीवर मजबूत सपोर्ट पाहायला मिळत आहे. तर 1,045 रुपये किमतीवर प्रतिकार पाहायला मिळत आहे. तज्ञांच्या मते, या कंपनीचे शेअर्स पुढील काही दिवसात 1,200 रुपये किंमत स्पर्श करतील.
तान्ला प्लॅटफॉर्म्स लिमिटेड ही कंपनी जागतिक स्तरावर ॲप्लिकेशन-टू-पर्सन सर्व्हिस प्रदान करणारी मेसेजिंग प्लॅटफॉर्म कंपनी म्हणून काम करते. या कंपनीच्या सेवा श्रेणीमध्ये वायरलेस टेलीफोन उद्योगातील उत्पादन विकास आणि अंमलबजावणी, एग्रीगेटर सेवा आणि ऑफशोअर डेव्हलपमेंट सेवा सामील आहेत. डिसेंबर 2023 पर्यंत या कंपनीच्या प्रवर्तकांनी कंपनीचे 44.15 टक्के भाग भांडवल धारण केले होते.
महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.