
SBI FD Interest Rates | जर तुम्हाला तुमचे संचित भांडवल गुंतवायचे असेल आणि ठराविक कालावधीनंतर गॅरंटीड इन्कम मिळवायचे असेल तर ही बातमी तुमच्यासाठी आहे. भारतीय ग्राहकांमध्ये सुरक्षित गुंतवणुकीसाठी फिक्स्ड डिपॉझिट (एफडी) हा अजूनही एक उत्तम पर्याय आहे.
सध्या अशा अनेक बँका आहेत ज्या आपल्या ग्राहकांना एफडीवर 8.30 टक्क्यांपर्यंत व्याज देत आहेत. या बँकांमध्ये स्टेट बँक ऑफ इंडियाचाही (एसबीआय) समावेश आहे. जाणून घेऊया एसबीआयसह अशा 5 बँकांबद्दल जे आपल्या ग्राहकांना एफडीवर सर्वाधिक व्याज देत आहेत.
आरबीएल बँक
आरबीएल बँक आपल्या सर्वसामान्य ग्राहकांना वेगवेगळ्या कालावधीसाठी 3.50% ते 7.80% पर्यंत व्याज देत आहे. तर बँक आपल्या ज्येष्ठ नागरिक ग्राहकांना याच कालावधीसाठी 4% ते 8.30% पर्यंत व्याज देत आहे.
आयडीएफसी फर्स्ट बँक
आयडीएफसी फर्स्ट बँक आपल्या सर्वसामान्य ग्राहकांना वेगवेगळ्या कालावधीसाठी 3.50% ते 7.50% पर्यंत व्याज देत आहे. तर बँक आपल्या ज्येष्ठ नागरिक ग्राहकांना याच कालावधीसाठी 4% ते 8% पर्यंत व्याज देत आहे.
अॅक्सिस बँक
अॅक्सिस बँक आपल्या सर्वसामान्य ग्राहकांना 3.50 टक्के ते 7.10 टक्क्यांपर्यंत व्याज देत आहे. तर बँक आपल्या ज्येष्ठ नागरिक ग्राहकांना एफडीवर 3.50% ते 7.85% पर्यंत व्याज देत आहे.
एचडीएफसी बँक
खासगी क्षेत्रातील सर्वात मोठी बँक एचडीएफसी बँक आपल्या सामान्य ग्राहकांना एफडीवर 3% ते 7.25% आणि ज्येष्ठ नागरिक ग्राहकांना 3.50% ते 7.75% पर्यंत व्याज देत आहे.
कोटक महिंद्रा बँक
कोटक महिंद्रा बँक सामान्य ग्राहकांसाठी 2.75% ते 7.20% आणि ज्येष्ठ नागरिक ग्राहकांसाठी 3.25% ते 7.70% पर्यंत व्याज देत आहे.
एसबीआय बँक
स्टेट बँक ऑफ इंडिया आपल्या सर्वसामान्य ग्राहकांना वेगवेगळ्या कालावधीसाठी 3.०% ते 7.10% पर्यंत व्याज देत आहे. तर बँक आपल्या ज्येष्ठ नागरिक ग्राहकांना 3.50% ते 7.60% पर्यंत व्याज देत आहे.
महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.