
Samvardhana Motherson Share Price | संवर्धन मदरसन इंटरनॅशनल कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणूकदारांना जबरदस्त नफा कमावून दिला आहे. या कंपनीचे शेअर्स 18 पैशांवरून वाढून 124 रुपये किमतीवर पोहचले आहेत. ज्या लोकांनी संवर्धन मदरसन इंटरनॅशनल कंपनीचे शेअर्स 18 पैसे किमतीवर खरेदी करून होल्ड केले होते, त्यांच्या गुंतवणुकीचे मूल्य 68000 टक्क्यांपेक्षा जास्त झाले आहेत. ( संवर्धन मदरसन इंटरनॅशनल कंपनी अंश )
संवर्धन मदरसन इंटरनॅशनल ही कंपनी मुख्यतः वाहन पार्टस आणि उपकरण निर्मिती क्षेत्रात व्यवसाय करते. आज शुक्रवार दिनांक 19 एप्रिल 2024 रोजी संवर्धन मदरसन इंटरनॅशनल स्टॉक 1.07 टक्के घसरणीसह 124.50 रुपये किमतीवर ट्रेड करत आहे.
संवर्धन मदरसन इंटरनॅशनल कंपनीने आतापर्यंत आपल्या गुंतवणुकदारांना 10 वेळा बोनस शेअर्स वाटप केले आहेत. 16 एप्रिल 2024 रोजी या कंपनीचे शेअर्स 124.25 रुपये किमतीवर क्लोज झाले होते. या कंपनीने आपल्या स्थापनेपासून आतपर्यंत गुंतवणूकदारांचे पैसे 68927 टक्के वाढवले आहेत.
मागील एका वर्षात संवर्धन मदरसन कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना 81 टक्के परतावा कमावून दिला आहे. या कंपनीचे शेअर्स 18 एप्रिल 2023 रोजी 68.71 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. 16 एप्रिल 2024 रोजी या कंपनीचे शेअर्स 124.25 रुपये किमतीवर पोहोचले होते.
मागील 6 महिन्यांत संवर्धन मदरसन इंटरनॅशनल कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना 30 टक्क्यांपेक्षा जास्त परतावा कमावून दिला आहे. या कंपनीच्या शेअर्सची 52 आठवड्यांची उच्चांक किंमत पातळी 126.55 रुपये होती. तर नीचांक किंमत पातळी 67.42 रुपये होती.
1997 ते 2022 दरम्यान संवर्धन मदरसन इंटरनॅशनल कंपनीने आपल्या शेअरधारकांना 10 वेळा बोनस शेअर्स वाटप केले आहे. ऑक्टोबर 2022 मध्ये या कंपनीने गुंतवणूकदारांना 1:2 या प्रमाणात मोफत बोनस शेअर्स वाटप केले होते. संवर्धन मदरसन इंटरनॅशनल कंपनीचे एकूण बाजार भांडवल 84000 कोटी रुपये आहे.
महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.