 
						Tata Power Share Price | टाटा समूहाचा भाग असलेल्या टाटा पॉवर कंपनीच्या शेअर्समध्ये उन्हाळी हंगामात जबरदस्त वाढ होण्याची शक्यता आहे. मागील एका वर्षात या कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना बक्कळ नफा कमावून दिला आहे. ( टाटा पॉवर कंपनी अंश )
शुक्रवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये टाटा पॉवर स्टॉक 2.52 टक्क्यांच्या घसरणीसह 419.05 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. 12 एप्रिल रोजी या कंपनीचे शेअर्स 444.10 रुपये या आपल्या 52 आठवड्यांच्या उच्चांक किंमत पातळीवर ट्रेड करत होते. शुक्रवार दिनांक 19 एप्रिल 2024 रोजी टाटा पॉवर स्टॉक 0.41 टक्के घसरणीसह 428 रुपये किमतीवर क्लोज झाला होता.
मागील एका वर्षात या कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना 120 टक्के परतावा कमावून दिला आहे. टाटा पॉवर कंपनी 8 मे 2024 रोजी आपले मार्च तिमाहीचे आर्थिक निकाल जाहीर करणार आहे. कंपनी मार्च तिमाहीच्या निकालासोबत गुंतवणुकदारांना लाभांश देखील वाटप करणार आहे. प्रभुदास लिल्लाधर फर्मच्या तज्ञांच्या मते, टाटा पॉवर स्टॉकमध्ये 444 रुपये किमतीवर मजबूत प्रतिकार पाहायला मिळत आहे.
आनंद राठी शेअर्स अँड स्टॉक ब्रोकर्स फर्मच्या तज्ञांच्या मते, टाटा पॉवर स्टॉकमध्ये 414 रुपये किमतीवर मजबूत सपोर्ट पाहायला मिळत आहे. तर 435 रुपये किमतीवर मजबूत प्रतिकार पाहायला मिळत आहे. तज्ञांच्या मते, पुढील एका महिन्यासाठी टाटा पॉवर स्टॉकची ट्रेडिंग रेंज 410 रुपये ते 450 रुपये दरम्यान असेल. टिप्स 2 ट्रेड्स फर्मच्या तज्ञांच्या मते, टाटा पॉवर स्टॉक 372 रुपये या नीचांक किंमत पातळीवर जाऊ शकतो. मार्च 2024 पर्यंत, टाटा पॉवर कंपनीच्या प्रवर्तकांनी कंपनीचे 46.86 टक्के भाग भांडवल धारण केले आहे.
महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
 
                 
		 
		 
		 
		 
		 
		 
		 
		 
		 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
		 
		 
		 
		 
		 
		 
		