 
						Bonus Shares | सध्या जर तुम्ही शेअर बाजारात गुंतवणूक करून मोफत बोनस शेअर्स मिळवू इच्छित असाल तर ही बातमी तुमच्या फायद्याची आहे. मोतीलाल ओसवाल फायनान्शियल कंपनीने आपल्या शेअर धारकांना मोफत बोनस शेअर्स वाटप करण्याची घोषणा केली आहे. ही बातमी जाहीर होताच या कंपनीचे शेअर्स तुफान तेजीत आले होते. ( मोतीलाल ओसवाल फायनान्शिअल कंपनी अंश )
मोतीलाल ओसवाल फायनान्शियल कंपनीच्या शेअर्सने आपली 52 आठवड्यांची नवीन उच्चांक किंमत स्पर्श केली आहे. शुक्रवार दिनांक 19 एप्रिल 2024 रोजी मोतीलाल ओसवाल फायनान्शियल स्टॉक 7.16 टक्के वाढीसह 2,235 रुपये किमतीवर क्लोज झाले होते.
मोतीलाल ओसवाल फायनान्शिअल कंपनीच्या शेअर्सची 52 आठवड्यांची नीचांक किंमत पातळी 583 रुपये होती. कंपनीने 26 एप्रिल रोजी संचालक मंडळाची बैठक आयोजित केली आहे. या बैठकीत कंपनीचे संचालक मोफत बोनस शेअर्स वाटप करण्याचा विचार करतील. 26 एप्रिल रोजी आयोजित करण्यात आलेल्या बैठकीत कंपनीचे संचालक मार्च 2024 तिमाहीचे निकाल मंजूर करतील. फेब्रुवारीमध्ये मोतीलाल ओसवाल फायनान्शियल कंपनीने आपल्या गुंतवणुकदारांना 14 रुपये लाभांश वाटप केला होता.
मागील एका वर्षात मोतीलाल ओसवाल फायनान्शिअल कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना 275 टक्के परतावा कमावून दिला आहे. 20 एप्रिल 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 601.20 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. तर 19 एप्रिल 2024 रोजी या कंपनीचे शेअर्स 2270.80 रुपये किमतीवर क्लोज झाले होते. मागील 6 महिन्यांत या कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना 130 टक्के परतावा कमावून दिला आहे.
याकाळात कंपनीचे शेअर्स 982.30 रुपयेवरून वाढून 2270 रुपये किमतीवर पोहचले आहेत. मागील एका महिन्यात मोतीलाल ओसवाल फायनान्शियल कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना 43 टक्के परतावा कमावून दिला आहे. 2024 या वर्षी मोतीलाल ओसवाल फायनान्शियल कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना 80 टक्के परतावा कमावून दिला आहे.
महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
 
                 
		 
		 
		 
		 
		 
		 
		 
		 
		 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
		 
		 
		 
		 
		 
		 
		 
		