19 May 2024 2:11 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Horoscope Today | तुमचे रविवारचे राशिभविष्य | 19 मे 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा रविवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या BEL Share Price | तज्ज्ञांकडून PSU BEL शेअरला 'BUY' रेटिंग, यापूर्वी दिला 700% परतावा, खरेदीला ऑनलाईन गर्दी Bonus Shares | पटापट मल्टिबॅगर परतावा देतोय हा शेअर, फ्री बोनस शेअर्स जाहीर, संधी सोडू नका Mazagon Dock Share Price | माझगाव डॉक स्टॉक चार्टवर तेजीचे संकेत, तज्ज्ञांकडून 'BUY' रेटिंग, यापूर्वी 245% परतावा दिला Malavya Raj Yog | मालव्य राजयोग 'या' 5 राशींच्या लोकांना मालामाल करणार, लाभस्थानी शुक्र ठरणार वरदान Titagarh Rail Systems Share Price | तज्ज्ञांकडून स्टॉकला 'Hold' रेटिंग, अल्पावधीत देणार 22% परतावा, खरेदीला गर्दी L&T Share Price | L&T कंपनीबाबत फायद्याची अपडेट आली, स्टॉक खरेदीला ऑनलाईन गर्दी, वेळीच एंट्री घ्या
x

Jio Financial Services Share Price | जिओ फायनान्शियल शेअर्सबाबत तज्ज्ञांचा महत्वाचा इशारा, स्टॉक चार्टचा संकेत काय ?

Jio Financial Services Share Price

Jio Financial Services Share Price | जिओ फायनान्शियल सर्व्हिसेस कंपनीच्या शेअर्समध्ये मजबूत तेजी पाहायला मिळत आहे. नुकताच या कंपनीने आपले मार्च 2024 तिमाहीचे आर्थिक निकाल जाहीर केले आहेत. मार्च तिमाहीत जिओ फायनान्शियल सर्व्हिसेस कंपनीचा निव्वळ नफा सहा टक्क्यांच्या वाढीसह 311 कोटी रुपये किमतीवर पोहोचला आहे. ( जिओ फायनान्शियल सर्व्हिसेस कंपनी )

रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेड कंपनीतून विलग झालेल्या जिओ फायनान्शियल सर्व्हिसेस कंपनीने डिसेंबर 2023 तिमाहीत 294 कोटी रुपये निव्वळ नफा कमावला होता. आज सोमवार दिनांक 22 एप्रिल 2024 रोजी जिओ फायनान्शियल सर्व्हिसेस स्टॉक 3.55 टक्के वाढीसह 383.25 रुपये किमतीवर ट्रेड करत आहे.

जानेवारी-मार्च 2024 या तिमाहीत जिओ फायनान्शियल सर्व्हिसेस कंपनीने 418 कोटी रुपये महसूल संकलित केला आहे. मागील वर्षी याच तिमाहीत कंपनीने 414 कोटी रुपये महसूल संकलित केला होता. मार्च तिमाहीत कंपनीचा खर्च किरकोळ वाढीसह 103 कोटी रुपये नोंदवला गेला आहे. आर्थिक वर्ष 2023-24 मध्ये या कंपनीने 1,605 कोटी रुपये निव्वळ नफा कमावला आहे. मागील आठवड्यात गुरुवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये या कंपनीचे शेअर्स 370 रुपये किमतीवर क्लोज झाले होते.

शेअर बाजारातील तज्ज्ञांच्या मते, जिओ फायनान्शियल सर्व्हिसेस स्टॉकमध्ये अल्पावधीसाठी ‘मंदी’ पाहायला मिळू शकते. रेलिगेअर ब्रोकिंग फर्मच्या तज्ञांच्या मते, अल्पावधीत हा स्टॉक 335 रुपये किमतीपर्यंत खाली जाऊ शकतो. रिकव्हरीनंतर हा शेअर पुन्हा 370 रुपये किमतीवर जाण्याची शक्यता आहे. सध्या जिओ फायनान्शियल सर्व्हिसेस स्टॉकमध्ये प्रॉफिट बुकींग पाहायला मिळू शकते, त्यामुळे टिप्स 2 ट्रेड्स फर्मच्या तज्ञांनी हा स्टॉक 318 रुपयेपर्यंत खाली जाण्याचा अंदाज व्यक्त केला आहे.

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Jio Financial Services Share Price NSE Live 22 April 2024.

हॅशटॅग्स

#Jio Financial Services Share Price(16)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x