
Vikas Lifecare Share Price | विकास लाइफकेअर कंपनीच्या पेनी स्टॉकमध्ये मजबूत तेजी पाहायला मिळत आहे. सोमवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये सेन्सेक्स निर्देशांक 73490 अंकांवर क्लोज झाला होता. तर निफ्टी-50 निर्देशांक 22,292 अंकांवर क्लोज झाला होता. ( विकास लाइफकेअर कंपनी अंश )
कालच्या ट्रेडिंग सेशनमध्ये बीपीसीएल, आयशर मोटर्स, टाटा कंझ्युमर, विप्रो, श्रीराम फायनान्स, ॲक्सिस बँक आणि लार्सन अँड टुब्रो या कंपन्यांचे शेअर्स तेजीत व्यवहार करत होते. तर एनटीपीसी, एचडीएफसी बँक, जेएसडब्ल्यू स्टील आणि आयटीसी लिमिटेड कंपनीचे शेअर्स विक्रीच्या दबावात ट्रेड करत होते.
विकास लाइफकेअर लिमिटेड कंपनीच्या पेनी स्टॉकने आपल्या गुंतवणुकदारांना मजबूत परतावा कमावून दिला आहे. कालच्या ट्रेडिंग सेशनमध्ये या कंपनीचे शेअर्स तीन टक्क्यांच्या वाढीसह 5.15 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. विकास लाइफकेअर कंपनीचे एकूण बाजार भांडवल 876 कोटी रुपये आहे.
या कंपनीच्या शेअर्समध्ये वाढ होण्याचे मुख्य कारण म्हणजे, कंपनीच्या कृषी उत्पादन विभागाला 50 कोटी रुपये मूल्याच्या ऑर्डर मिळाल्या आहेत. आज मंगळवार दिनांक 23 एप्रिल 2024 रोजी विकास लाइफकेअर स्टॉक 4.85 टक्के वाढीसह 5.40 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.
या ऑर्डर अंतर्गत विकास लाइफकेअर कंपनीला प्रीमियम तांदळाचा पुरवठा करण्याची 40 कोटी रुपये मूल्याची ऑर्डर मिळाली आहे. तर ऑरगॅनिक जातीच्या तांदळाचा पुरवठा करण्याची 10 कोटी रुपये मूल्याची ऑर्डर मिळाली आहे. 2023-24 या आर्थिक वर्षात विकास लाइफकेअर कंपनीने 450 कोटी रुपये महसूल संकलित केला आहे. तर 2022-23 या आर्थिक वर्षात कंपनीने 360 कोटी रुपये महसूल संकलित केला होता.
विकास लाईफ केअर लिमिटेड कंपनीने दुबईमध्ये आपली पूर्ण मालकीची उपकंपनी स्थापन केली आहे. विकास लाइफ केअर ही कंपनी प्लास्टिकच्या कचऱ्याचा पुनर्वापर, औद्योगिक अनुप्रयोगांसाठी पॅलेट्स आणि इंटरलॉकिंग टाइल्स बनवण्याचा व्यवसाय करते.
महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.