
DCB Bank Share Price | मार्च 2024 तिमाहीचे आर्थिक निकाल जाहीर केल्यानंतर अनेक ब्रोकरेज फर्मने डीसीबी बँकेच्या शेअर्सबाबत सकारात्मक भावना व्यक्त केल्या आहेत. मार्च 2024 तिमाहीत डीसीबी बँकेने सर्व आघाड्यांवर जबरदस्त कामगिरी केली आहे. ( डीसीबी बँक अंश )
मागील आठवड्यात शुक्रवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये डीसीबी बँक स्टॉक 1.72 टक्क्यांच्या वाढीसह 138.80 रुपये किमतीवर क्लोज झाले होते. आज सोमवार दिनांक 29 एप्रिल 2024 रोजी डीसीबी बँकेचे शेअर्स 1.84 टक्के वाढीसह 141.30 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.
ब्रोकिंग फर्म प्रभुदास लिलाधरच्या तज्ञांनी डीसीबी बँकेच्या शेअर्सवर ‘BUY’ रेटिंग देऊन 180 रुपये टार्गेट प्राइससाठी गुंतवणूक करण्याचा सल्ला दिला आहे. ब्रोकरेज फर्मच्या मते, मार्च तिमाहीत डीसीबी बँकेच्या NII मधे वाढ आणि फी ऑफसेट कोर आणि मालमत्ता मूल्य सुधारणा पाहायला मिळाली आहे. डीसीबी बँकेचे फी उत्पन्न प्रोफाइल देखील आर्थिक वर्ष 2023-24 मध्ये वर्ष-दर-वर्ष कालावधीत सुधारले आहेत. तज्ञांच्या मते, पुढील 3-4 वर्षात बँकेचे ताळेबंद दुप्पट होण्याची अपेक्षा आहे. आर्थिक वर्ष 2024-26 बँकेच्या कर्ज ठेवींमध्ये 17टक्के ते 18 टक्के CAGR दराने वाढ होण्याची शक्यता आहे.
DCB बँकेला 31 मे 1995 रोजी बँकिंग परवाना जारी करण्यात आला होता. मार्च 2024 तिमाहीत डीसीबी बँकेचा निव्वळ नफा 9 टक्के वाढीसह 156 कोटी रुपये नोंदवला गेला आहे. डीसीबी बँकेचे निव्वळ व्याज उत्पन्न 4 टक्क्यांच्या वाढीसह 508 कोटी रुपये नोंदवले गेले आहे.
मागील वर्षी याच काळात बँकेचे निव्वळ व्याज उत्पन्न 486 कोटी रुपये नोंदवले गेले होते. डीसीबी बँकेचे निव्वळ व्याज मार्जिन 3.62 टक्क्यांवर घसरले आहे. मागील वर्षी हे प्रमाण 4.18 टक्के होते. डीसीबी बँकेने नुकताच इक्विटी शेअर्स किंवा कन्व्हर्टेबल सिक्युरिटीजद्वारे 500 कोटी रुपये भांडवल उभारणी करण्याचा प्रस्ताव मंजूर केला आहे.
महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.