
Yes Bank Share Price | येस बँक स्टॉकबाबत एक मोठी अपडेट आली आहे. अनेक स्टॉक मार्केट तज्ञांनी या बँकेचे शेअर्स विकण्याचा सल्ला दिला आहे. मागील काही दिवसापासून येस बँकेचे शेअर्स जबरदस्त अस्थिरतेत ट्रेड करत आहेत. जानेवारी-मार्च 2024 तिमाहीत येस बँकेचा नफा दुप्पट वाढीसह 452 कोटी रुपये नोंदवला आहे. ( येस बँक अंश )
मात्र ब्रोकरेज फर्म जेएम फायनान्शिअल आणि कोटक इन्स्टिट्यूशनल इक्विटीज फर्मने व्हॅल्युएशनचा हवाला देत येस बँकेच्या शेअर्सवर ‘SELL’ रेटिंग दिली आहे. जेएम फायनान्शियल फर्मच्या मते, येस बँकेचे शेअर्स 18 रुपये किमतीवर जाऊ शकतात. आज गुरूवार दिनांक 2 मे 2024 रोजी येस बँकेचे शेअर्स 2.49 टक्के घसरणीसह 25.50 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.
ब्रोकरेज फर्मने आपल्या अहवालात म्हंटले आहे की, येस बँकेने मालमत्तेच्या गुणवत्तेत सुधारणा केली आहे. उच्च कर्ज वसुली, स्थिर मार्जिन आणि मजबूत वाढ यामुळे येस बँकेच्या शेअर्समध्ये चांगली कामगिरी पाहायला मिळाली होती. मात्र कोटक इन्स्टिट्यूशनल इक्विटीजने मार्च तिमाही निकालानंतर व्हॅल्युएशनचा हवाला देत येस बँक स्टॉक विकण्याचा सल्ला दिला आहे. कोटक फर्मच्या तज्ञांच्या मते, येस बँकेचे शेअर्स 19 रुपये किमतीवर जाऊ शकतो.
आयसीआयसीआय सिक्युरिटीज फर्मच्या तज्ञांनी येस बँकेच्या शेअर्सची टार्गेट प्राइस वाढवली आहे. ब्रोकरेज फर्म आयसीआयसीआय सिक्युरिटीजच्या तज्ञांनी आपल्या अहवालात म्हंटले आहे की, येस बँकेचे मार्च 2024 तिमाहीचे निकाल त्याच्या अपेक्षेनुसार होते. येस बँकेच्या कर्ज आणि ठेवींमध्ये किंचित वाढ नोंदवली आहे. ब्रोकरेज फर्मने येस बँकेची टार्गेट प्राइस 17 रुपयेवरून वाढून 20 रुपये केली आहे.
मंगळवारच्या व्यवहारात येस बँकेचे शेअर्स 3.47 टक्के घसरणीसह 26.17 रुपये किमतीवर क्लोज झाले होते. मार्च 2024 तिमाहीत येस बँकेचा निव्वळ नफा दुप्पट वाढून 452 कोटी रुपये नोंदवला गेला आहे. बुडीत कर्जाची तरतूद कमी झाल्यामुळे येस बँकेच्या निव्वळ नफ्यात वाढ पाहायला मिळाली आहे.
आर्थिक वर्ष 2022-23 च्या मार्च तिमाहीत येस बँकेने 202.43 कोटी रुपये निव्वळ नफा कमावला होता. आर्थिक वर्ष 2023-24 मध्ये येस बँकेने 1,251 कोटी रुपये निव्वळ नफा नोंदवला आहे. बँकेच्या निव्वळ नफ्यात वार्षिक आधारावर 74 टक्क्यांची वाढ नोंदवली गेली आहे.
महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.