
Vedanta Share Price | मागील काही आठवड्यापासून भारतीय शेअर बाजारात सुरू असलेली उलाढाल गुंतवणूकदारांची चिंता वाढवत आहे. नुकताच इंडिट्रेड कॅपिटल फर्मच्या तज्ञांनी मेटल सेक्टरमधील स्टॉकबाबत आपले मत मांडले आहे. तज्ञांच्या मते, काही मेटल स्टॉक योग्य मूल्यांकनानुसार ट्रेड करत आहेत. ( वेदांता कंपनी अंश )
बऱ्याच काळापासून मेटल स्टॉकमध्ये फारच कमी गुंतवणूक होत होती. त्यामुळे आता अचानक गुंतवणूक वाढल्याने त्यात चढ-उतार पाहायला मिळत आहेत. सध्या भारत सरकारने आपले लक्ष इन्फ्रा आणि मॅन्युफॅक्चरिंग सेक्टरच्या विकासावर केंद्रित केले आहे. त्यामुळे मेटल स्टॉकमध्ये मजबूत वाढीचे संकेत मिळत आहेत.
इंडिट्रेड कॅपिटल फर्मच्या तज्ञांच्या मते, मेटल सेक्टरमधील वेदांता कंपनीचे शेअर्स गुंतवणुकीसाठी आकर्षक वाटत आहेत. नुकताच या कंपनीने आपले मार्च तिमाहीचे निकाल जाहीर केले आहेत. कंपनीच्या आर्थिक कामगिरीत जबरदस्त सुधारणा पाहायला मिळाली आहे.
तज्ञांच्या मते, वेदांता स्टॉक पुढील एक-दोन वर्षांसाठी होल्ड केल्यास मजबूत परतावा देऊ शकतो. तज्ञांच्या मते, वेदांता स्टॉक पुढील काही महिन्यात 500 रुपये किंमत स्पर्श करू शकतो. आज या कंपनीच्या शेअर्सने आपली 52 आठवड्यांची नवीन उच्चांक किंमत पातळी स्पर्श केली आहे. आज गुरूवार दिनांक 2 मे 2024 रोजी वेदांता स्टॉक 3.51 टक्के वाढीसह 411.80 रुपये किमतीवर ट्रेड करत आहे.
वेदांता स्टॉकमध्ये व्हॅल्यू अनलॉकिंगमुळे मजबूत तेजी पाहायला मिळत आहे. पुढील सहा महिन्यांत वेदांता कंपनीच्या शेअरधारकांना एका शेअरवर सहा विविध कंपन्यांचे सहा शेअर्स दिले जातील. म्हणजेच वेदांता स्टॉक 1:6 या प्रमाणात स्प्लिट होणार आहे. या सर्व सहा कंपन्या जबरदस्त कामगिरी करण्यास सज्ज आहेत. सध्या जर तुम्ही 2 वर्षाचा दृष्टिकोन ठेवून हा स्टॉक खरेदी केला तर तुम्ही मालामाल होऊ शकता. हा स्टॉक दोन वर्षांच्या आत 500 रुपये किमतीवर जाऊ शकतो.
महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.