
Tata Technologies Share Price | टाटा समूहाचा भाग असलेल्या टाटा टेक्नॉलॉजी कंपनीने 3 मे रोजी आपले मार्च तिमाहीचे निकाल जाहीर केले. त्यानंतर शेअरमध्ये जबरदस्त घसरण पाहायला मिळाली होती. मार्च 2024 तिमाहीत टाटा टेक्नॉलॉजी कंपनीच्या निव्वळ नफ्यात 28 टक्क्यांची घसरण पहायला मिळाली होती. मार्च तिमाहीत टाटा टेक कंपनीने 157 कोटी रुपये निव्वळ नफा कमावला आहे. ( टाटा टेक्नॉलॉजी कंपनी अंश )
मागील आर्थिक वर्षाच्या मार्च तिमाहीत टाटा टेक्नॉलॉजी कंपनीने 217 कोटी रुपये निव्वळ नफा कमावला होता. तिमाही दर तिमाही आधारावर टाटा टेक्नॉलॉजी कंपनीच्या नफ्यात 7 टक्क्यांची घसरण झाली आहे. शुक्रवार दिनांक 3 मे 2024 रोजी टाटा टेक्नॉलॉजी स्टॉक 0.48 टक्के घसरणीसह 1,085 रुपये किमतीवर क्लोज झाला होता.
डिसेंबर 2023 तिमाहीत टाटा टेक कंपनीने 170.2 कोटी रुपये नफा कमावला होता. मार्च 2024 तिमाहीत टाटा टेक्नॉलॉजी कंपनीचा महसूल 7 टक्क्यांच्या घसरणीसह 1,301 कोटी रुपये नोंदवला गेला होता. मागील आर्थिक वर्षाच्या मार्च तिमाहीत कंपनीने 1,402 कोटी रुपये महसूल संकलित केला होता.
टाटा टेक्नॉलॉजी कंपनीच्या महसुल संकलनात तिमाही आधारावर 0.9 टक्क्यांची वाढ नोंदवली गेली होती. आर्थिक वर्ष 2023-2024 मध्ये टाटा टेक्नॉलॉजी कंपनीचा निव्वळ नफा 8 टक्क्यांच्या वाढीसह 624 कोटी रुपये नोंदवला गेला आहे. तर आर्थिक वर्ष 2022-2023 मध्ये कंपनीने 679.3 कोटी रुपये निव्वळ नफा कमावला होता.
टाटा टेक्नॉलॉजी कंपनीचे ऑपरेटिंग प्रॉफिट मार्जिन म्हणजेच EBITDA मार्जिन संपूर्ण आर्थिक वर्षात 15 टक्के होते. आर्थिक वर्ष 2023-2024 मध्ये टाटा टेक्नॉलॉजी कंपनीने एकूण 12 मोठे सौदे केले. याचे मुल्य 50 दशलक्ष डॉलर्सपेक्षा जास्त होते. 5 मोठ्या सौद्यांचे मूल्य 1.5 ते 2.5 दशलक्ष डॉलर्स होते. आता टाटा टेक्नॉलॉजी कंपनीच्या संचालक मंडळाने आपल्या गुंतवणुकदारांना 8.40 रुपये अंतिम लाभांश वाटप करण्याची घोषणा केली आहे. यासह प्रत्येक शेअरवर कंपनी आपल्या गुंतवणुकदारांना 1.65 रुपये विशेष लाभांश देखील वाटप करण्याचा निर्णय घेतला आहे.
लाभांश वाटपाच्या प्रस्तावाला कंपनीच्या शेअरधारकांची मंजुरी मिळणे बाकी आहे. टाटा टेक्नॉलॉजी कंपनीच्या संचालक मंडळाने वॉरेन केविन हॅरिस यांना साडेतीन वर्षांसाठी सीईओ आणि व्यवस्थापकीय संचालक पदावर पुनर्नियुक्त करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यांचा कार्यकाळ 9 सप्टेंबर 2024 ते 8 मार्च 2028 पर्यंत असेल.
शुक्रवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये टाटा टेक स्टॉक 1,085 रुपये किमतीवर क्लोज झाला होता. 2024 या वर्षाच्या सुरुवातीपासून आतापर्यंत या कंपनीचे शेअर्स 8 टक्क्यांनी घसरले आहेत. मागील एका वर्षभरात टाटा टेक्नॉलॉजी स्टॉक 17.36 टक्के घसरला आहे.
महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.