
Tata Motors Share Price | टाटा मोटर्स कंपनीच्या शेअर्सवर जबरदस्त विक्रीचा दबाव पाहायला मिळत आहे. मागील काही ट्रेडिंग सेशनमध्ये टाटा मोटर्स स्टॉकमध्ये जोरदार नफा वसुली पाहायला मिळाली. मागील आठवड्यात शुक्रवारी निकाल जाहीर करण्यापूर्वी टाटा मोटर्स स्टॉक 1.162 टक्क्यांच्या वाढीसह 1,047 रुपये किमतीवर क्लोज झाले होते. तर कालच्या ट्रेडिंग सेशनमध्ये हा स्टॉक 8 टक्के खाली आला होता. टाटा मोटर्स कंपनीने शुक्रवारी आपले मार्च तिमाहीचे आर्थिक निकाल जाहीर केले. ( टाटा मोटर्स कंपनी अंश )
आर्थिक वर्ष 2023-2024 च्या मार्च तिमाहीत टाटा मोटर्स कंपनीचा निव्वळ नफा वार्षिक आधारावर 46 टक्के वाढीसह 17,529 कोटी रुपये नोंदवला गेला आहे. दरम्यान टाटा मोटर्स कंपनीचा एकत्रित महसूल 13.3 टक्के वाढीसह 1,19,986.31 कोटी रुपये नोंदवला गेला आहे. आज मंगळवार दिनांक 14 मे 2024 रोजी टाटा मोटर्स स्टॉक 0.35 टक्के घसरणीसह 956.40 रुपये किमतीवर ट्रेड करत आहे.
टाटा मोटर्स कंपनीने मार्च 2024 निकालासह आपल्या गुंतवणुकदारांना प्रति शेअर 6 रुपये अंतिम लाभांश वाटप जाहीर करण्याची घोषणा केली आहे. मार्च तिमाहीत कंपनीचा EBITDA 17,900 कोटी रुपये नोंदवला गेला होता, जो मागील वर्षीच्या याच तिमाहीच्या तुलनेत 26.6 टक्के अधिक आहे. टेक्निकल चार्टवर टाटा मोटर्स स्टॉक मजबूत स्थितीत पाहायला मिळत आहे. कालच्या ट्रेडिंग सेशनमध्ये मात्र टाटा मोटर्स स्टॉक 8 घसरणीसह क्लोज झाला होता.
पेट्रेल कॅपिटल रिसर्च फर्मच्या तज्ञांच्या मते, टाटा मोटर्स स्टॉक पुढील दोन महिन्यांत 1250 रुपये किंमत स्पर्श करू शकतो. तज्ञांनी या स्टॉकमध्ये गुंतवणूक करताना 990 रुपये किमतीवर स्टॉप लॉस लावण्याचा सल्ला दिला आहे. टाटा मोटर्स स्टॉक 22 एप्रिल 2024 रोजी स्पर्श केलेल्या 950 रुपये या सपोर्ट लेव्हलवरून पुन्हा वाढला होता. मागील सहा महिन्यात टाटा मोटर्स कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना 42 टक्के परतावा कमावून दिला आहे. तर मागील एका वर्षात या कंपनीचे शेअर 80 टक्के मजबूत झाले आहेत.
महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.