
IREDA Share Price | आयआरईडीए या सरकारी कंपनीच्या शेअर्समध्ये जोरदार खरेदी पाहायला मिळत आहे. शेअर बाजारातील तज्ञांनी या कंपनीचे शेअर्स होल्ड करण्याचा सल्ला दिला आहे. तज्ञांच्या मते, आयआरईडीए स्टॉक 183 रुपयेच्या पार गेला तर अल्पावधीत 200 रुपये किमतीवर जाऊ शकतो. ( आयआरईडीए कंपनी अंश )
तज्ञांच्या मते, आयआरईडीए स्टॉकने 160 रुपये किमतीवर मजबूत सपोर्ट निर्माण केला आहे. आणि 185-190 रुपये किमतीवर जबरदस्त प्रतिकार पाहायला मिळत आहे. आज शुक्रवार दिनांक 17 मे 2024 रोजी आयआरईडीए स्टॉक 1.93 टक्के वाढीसह 174.45 रुपये किमतीवर ट्रेड करत आहे.
शेअर बाजारातील तज्ञांनी गुंतवणुकदारांना 160 रुपये किमतीवर स्टॉपलॉस लावून आयआरईडीए स्टॉक खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे. तज्ञांच्या मते, जर हा स्टॉक 180-185 रुपयेच्या पार गेला तर अल्पावधीत शेअर 200 रुपये किंमत स्पर्श करू शकतो.
गुरुवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये आयआरईडीए स्टॉक 0.49 टक्के वाढीसह 171.15 रुपये किमतीवर क्लोज झाला होता. या शेअरची 52 आठवड्यांची उच्चांक किंमत पातळी 214.80 रुपये होती. मागील 6 महिन्यांत आयआरईडीए कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणुकदारांना 185.25 टक्के परतावा कमावून दिला आहे.
मार्च 2024 मध्ये संपलेल्या तिमाहीत आयआरईडीए कंपनीच्या नफ्यात मागील वर्षीच्या तुलनेत 33 टक्क्यांची वाढ झाली आहे. या कंपनीने मार्च तिमाहीत 337.4 कोटी रुपये निव्वळ नफा कमावला आहे. मागील वर्षी याच तिमाहीत आयआरईडीए कंपनीने 253.6 कोटी रुपये नफा कमावला होता. मार्च 2024 तिमाहीत आयआरईडीए कंपनीच्या निव्वळ व्याज उत्पन्नात मागील वर्षीच्या तुलनेत 35 टक्क्यांची वाढ झाली आहे.
महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.