
Tata Motors Share Price | टाटा समूहाचा भाग असलेल्या टाटा मोटर्स कंपनीने चालू आर्थिक वर्षामध्ये नवीन उत्पादने आणि तंत्रज्ञानावर 43,000 कोटी रुपये गुंतवणूक करण्याची घोषणा केली आहे. या गुंतवणुकीत टाटा समूहाच्या ब्रिटीश युनिट जग्वार लँड रोव्हरमध्ये सर्वाधिक गुंतवणूक केली जाणार आहे. ( टाटा मोटर्स कंपनी अंश )
आर्थिक वर्ष 2023-24 मध्ये टाटा मोटर्स कंपनीने JLR मध्ये 30,000 कोटी रुपये आणि टाटा मोटर्समध्ये 8,000 कोटी रुपये गुंतवणूक केली होती. आज मंगळवार दिनांक 21 मे 2024 रोजी टाटा मोटर्स स्टॉक 0.33 टक्के घसरणीसह 950.80 रुपये किमतीवर ट्रेड करत आहे.
टाटा मोटर्स कंपनीचे मुख्य वित्तीय अधिकारी पी.बी.बालाजी यांनी तिमाही निकालांमध्ये माहिती दिली की, मागील आर्थिक वर्षात JLR कंपनीमध्ये 3.3 अब्ज पौंड म्हणजेच 33,000 कोटीपेक्षा जास्त गुंतवणूक झाली होती. आणि टाटा मोटर्स कंपनीमध्ये 8,200 कोटी रुपये गुंतवणूक झाली होती. अशा प्रकारे मागील एका आर्थिक वर्षात टाटा मोटर्स कंपनीने आपल्या वाहन व्यवसायात 41,200 कोटी रुपये गुंतवणूक केली होती.
2024-25 या चालू आर्थिक वर्षात टाटा मोटर्स कंपनी आपल्या JLR युनिटमध्ये 3.5 अब्ज पौंड म्हणजेच 35,000 कोटी रुपये गुंतवणूक करणार आहे. आणि टाटा मोटर्स कंपनीमध्ये 8,000 कोटी रुपये गुंतवणूक केली जाणार आहे. जग्वार लँड रोव्हर कंपनीचे सीएफओ रिचर्ड मोलिनेक्स म्हणाले की, आर्थिक वर्ष 2025-26 मध्ये आमची अनेक नवीन उत्पादने बाजारात लाँच होतील. तोपर्यंत आमची रेंज रोव्हर बीईव्ही आणि इतर उत्पादने बाजारात असतील.
SBI सिक्युरिटीज फर्मच्या तज्ञांच्या मते, गुंतवणूकदारांनी टाटा मोटर्स स्टॉक 900-920 रुपयेच्या आसपास खरेदी करावा. पुढील काळात हा स्टॉक मजबूत वाढू शकतो. शेअरखान फर्मने टाटा मोटर्स स्टॉकवर 1188 रुपये टार्गेट प्राइस जाहीर केली आहे. तज्ञांनी पुढील 6-12 महिन्यांत हा शेअर 1200 ते 1250 रुपये किमतीवर जाण्याचा अंदाज व्यक्त केला आहे.
महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.