
Narmada Agrobase Share Price | नर्मदा ऍग्रोबेस लिमिटेड कंपनीचे शेअर्स तुफान तेजीत वाढत आहेत. शनिवारी विशेष ट्रेडिंग सेशन दरम्यान या कंपनीचे शेअर्स 5 टक्के वाढीसह 23.20 रुपये किमतीवर पोहचले होते. आज देखील या कंपनीचे शेअर्स मजबूत तेजीत वाढत आहेत. मार्च 2024 तिमाहीत नर्मदा ऍग्रोबेस लिमिटेड कंपनीने निव्वळ नफ्यात 523 टक्क्यांची वाढ नोंदवली आहे. ( नर्मदा ऍग्रोबेस लिमिटेड कंपनी अंश )
ही कंपनी मुख्यतः कापूस, बियाणे, पेंड केक, गुरांचा चारा आणि इतर अनेक कृषी उत्पादन आणि प्रक्रिया करण्याचा व्यवसाय करते. आज मंगळवार दिनांक 21 मे 2024 रोजी नर्मदा ऍग्रोबेस लिमिटेड कंपनीचे शेअर्स 4.96 टक्के वाढीसह 24.35 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत. नर्मदा ऍग्रोबेस लिमिटेड कंपनीच्या शेअरची 52 आठवड्यांची उच्चांक किंमत पातळी 34.85 रुपये होती. तर नीचांक किंमत पातळी 16.55 रुपये होती.
या कंपनीचे एकूण बाजार भांडवल 31.43 कोटी रुपये आहे. मार्च 2024 तिमाहीमध्ये या कंपनीने 2.62 टक्के वाढीसह 18.74 कोटी रुपये महसूल संकलित केला आहे. या कंपनीचा ROE 4.18 टक्के आहे. आणि ROCE 6.87 टक्के आहे. तसेच कंपनीचे कर्ज-ते-इक्विटी गुणोत्तर 0.64 आहे. मागील वर्षी याच तिमाहीत कंपनीने 18.26 कोटी रुपये महसूल संकलित केला होता.
मार्च 2024 तिमाहीत नर्मदा ऍग्रोबेस लिमिटेड कंपनीने निव्वळ नफ्यात 523 टक्क्यांची वाढ नोंदवली आहे. मार्च 2024 तिमाहीत या कंपनीने 61.02 लाख निव्वळ नफा कमावला आहे. तर मागील वर्षी याच तिमाहीत कंपनीने 9.79 लाख रुपये निव्वळ नफा कमावला होता. डिसेंबर 2023 तिमाहीत या कंपनीने 12.84 लाख रुपये निव्वळ नफा कमावला होता.
नर्मदा ॲग्रोबेस लिमिटेड ही कंपनी मुख्यतः डिलिस्टेड कापूस बियाणे आणि पशुखाद्य उत्पादन आणि विक्री संबंधित व्यवसायात सक्रिय आहे. ही कंपनी कापूस बियाणे केक, पशुखाद्य आणि सोयाबीन केकचे उत्पादन आणि प्रक्रिया संबंधित व्यवसाय करते. कंपनीच्या उत्पादनांमध्ये कॉटन सीड मील, ब्लीच्ड कॉटन लिटर, मल्टीग्रेन मील हाय प्रोटीन, मक्याचे ऑइल केक, कंपाऊंड कॅटल फीड, कॉटन सीड ऑइल केक गवार कोरमा, मक्याचे पेंड, कॉटन लिंटर, पोल्ट्री फीड, कॅटल फीड आणि डिहायड्रेटेड कॉटन सीड्स यांचा समावेश आहे.
महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.