
Polycab Share Price | मागील काही दिवसापासून भारतीय शेअर बाजारात मजबूत अस्थिरता पाहायला मिळत आहे. अशा काळात कोणते शेअर्स खरेदी करावे, याबाबत गुंतवणूकदारांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे. त्यामुळे शेअर बाजारातील तज्ञांनी गुंतवणूक करण्यासाठी काही शेअर्स निवडले आहेत, जे पुढील काळात मजबूत परतावा कमावून देऊ शकतात. चला तर मग जाणून घेऊ पुढील काळात तेजीत वाढणाऱ्या शेअर्सची सविस्तर माहिती.
एमटीएआर टेक्नॉलॉजी :
शेअर बाजारातील तज्ञांनी या कंपनीचे शेअर्स 2800 रुपये टार्गेट प्राइससाठी खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे. आज सोमवार दिनांक 27 मे 2024 रोजी या कंपनीचे शेअर्स 0.95 टक्के घसरणीसह 2,128.05 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत. या कंपनीच्या शेअर्सची 52 आठवड्यांची उच्चांक किंमत पातळी 2920 रुपये होती. मागील आठवड्यात या कंपनीचे शेअर्स 9 टक्के आणि मागील दोन आठवड्यांत 20 टक्के वाढले आहेत.
हिंदुस्तान युनिलिव्हर :
शेअर बाजारातील तज्ञांनी या कंपनीचे शेअर्स 2900 रुपये टार्गेट प्राइससाठी खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे. आज सोमवार दिनांक 27 मे 2024 रोजी या कंपनीचे शेअर्स 1.04 टक्के वाढीसह 2,393.70 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत. या कंपनीच्या शेअरची 52 आठवड्यांची उच्चांक किंमत पातळी 2768 रुपये होती.
सिप्ला :
शेअर बाजारातील तज्ञांनी या कंपनीचे शेअर्स 1720 रुपये टार्गेट प्राइससाठी खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे. आज सोमवार दिनांक 27 मे 2024 रोजी या कंपनीचे शेअर्स 0.48 टक्के घसरणीसह 1,479.35 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत. या कंपनीच्या शेअरची 52 आठवड्यांची उच्चांक किंमत पातळी 1519 रुपये होती. मागील एका आठवड्यात या कंपनीचे शेअर्स 6 टक्के आणि मागील दोन आठवड्यात 10 टक्के वाढले आहे.
ICICI बँक :
शेअर बाजारातील तज्ञांनी या कंपनीचे शेअर्स 1300 रुपये टार्गेट प्राइससाठी खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे. आज सोमवार दिनांक 27 मे 2024 रोजी या कंपनीचे शेअर्स 0.86 टक्के वाढीसह 1,141.70 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत. या कंपनीच्या शेअरची 52 आठवड्यांची उच्चांक किंमत पातळी 1170 रुपये होती. मागील एका आठवड्यात या कंपनीचे शेअर्स 2 टक्के आणि दोन आठवड्यात 4 टक्के वाढले आहेत.
पॉलीकॅब :
शेअर बाजारातील तज्ञांनी या कंपनीचे शेअर्स 7500 रुपये टार्गेट प्राइससाठी खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे. आज सोमवार दिनांक 27 मे 2024 रोजी या कंपनीचे शेअर्स 2.90 टक्के वाढीसह 6,878.30 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत. या कंपनीच्या शेअर्सची 52 आठवड्यांची उच्चांक किंमत पातळी 6843 रुपये होती. मागील एका आठवड्यात या कंपनीचे शेअर्स 3 टक्के आणि दोन आठवड्यात 9 टक्के वाढले आहेत.
महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.