
Tata Steel Share Price | टाटा समूहाचा भाग असलेल्या टाटा स्टील कंपनीचे शेअर्स गुरुवारी 4 टक्क्यांनी घसरले होते. आज मात्र हा स्टॉक मजबूत तेजीत वाढत आहे. मागील एका वर्षभरात टाटा स्टील कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना 60 टक्के पस्तावा कमावून दिला आहे. नुकताच ब्रोकरेज फर्म जेफरीजने टाटा स्टील स्टॉकवर 200 रुपये टार्गेट प्राइस जाहीर केली आहे. ( टाटा स्टील कंपनी अंश )
29 मे 2024 रोजी या कंपनीचे शेअर्स 174 रुपये किमतीवर क्लोज झाले होते. म्हणजेच सध्याच्या किमतीच्या तुलनेत टाटा स्टील स्टॉक 15 टक्क्यांनी वाढू शकतो. आज शुक्रवार दिनांक 31 मे 2024 रोजी टाटा स्टील स्टॉक 2.16 टक्के वाढीसह 167.70 रुपये किमतीवर ट्रेड करत आहे. नुकताच टाटा स्टील कंपनीने आपल्या परकीय उपकंपन्यांचे कर्ज परतफेड करण्यासाठी 2.1 अब्ज डॉलर्स गुंतवणूक करण्याची घोषणा केली आहे.
मागील 6 महिन्यांत टाटा स्टील स्टॉकने आपल्या गुंतवणुकदारांना 30 टक्क्यांपेक्षा जास्त परतावा कमावून दिला आहे. 2024 या वर्षात टाटा स्टील स्टॉक 20 टक्क्यांनी वाढला आहे. या कंपनीच्या शेअर्सची 52 आठवड्यांची उच्चांक किंमत पातळी 178 रुपये होती. तर नीचांक किंमत पातळी 105.65 रुपये होती. या कंपनीचे एकूण बाजार भांडवल 2.07 लाख कोटी रुपये आहे.
मार्च 2024 च्या तिमाहीत टाटा स्टील कंपनीचा एकत्रित नफा 64.59 टक्के घसरून 554.56 कोटी रुपये नोंदवला गेला आहे. एका वर्षभरापूर्वी याच तिमाही कालावधीत टाटा स्टील कंपनीने 1,566.24 कोटी रुपये नफा कमावला होता. जानेवारी-मार्च 2024 तिमाहीत या कंपनीने 63,131.08 कोटी रुपये महसूल संकलित केला आहे.
मागील वर्षी याच तिमाहीत कंपनीने 58,863.22 कोटी रुपये महसूल संकलित केला होता. टाटा स्टील कंपनीचा खर्च मागील वर्षीच्या 59,918.15 कोटी रुपयेच्या तुलनेत कमी होऊन 56,496.88 कोटी रुपयेवर आला आहे. टाटा स्टील कंपनीने आपल्या शेअरधारकांना आर्थिक वर्ष 2023-24 साठी प्रति इक्विटी शेअर 3.60 रुपये लाभांश वाटप करण्याची घोषणा केली आहे.
महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.