
Penny Stocks | केसर इंडिया या कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना जबरदस्त परतावा कमावून दिला आहे. मंगळवारी संपूर्ण स्टॉक मार्केट क्रॅश झाला होता, त्यावेळी केसर इंडिया कंपनीचे शेअर्स 5 टक्क्यांच्या अप्पर सर्किटसह 677.30 रुपये किमतीवर क्लोज झाले होते. ( केसर इंडिया या कंपनी अंश )
मागील 15 महिन्यांत केशर इंडिया कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणूकदारांना 3900 टक्के परतावा कमावून दिला आहे. या कंपनीच्या शेअर्सची 52 आठवड्यांची उच्चांक किंमत पातळी 688.10 रुपये होती. तर नीचांक किंमत पातळी 24.44 रुपये होती. आज बुधवार दिनांक 5 जून 2024 रोजी केसर इंडिया स्टॉक 4.99 टक्के वाढीसह 711 रुपये किमतीवर ट्रेड करत आहे.
10 मार्च 2023 रोजी केसर इंडिया कंपनीचे शेअर्स 16.57 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. तर 4 जून 2024 रोजी या कंपनीचे शेअर्स 677.30 रुपये किमतीवर क्लोज झाले होते. मागील 15 महिन्यांत या कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना 3987 टक्के परतावा कमावून दिला आहे. मागील एका वर्षात केसर इंडिया स्टॉक तब्बल 2235 टक्के वाढला आहे. 13 जून 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 29 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. तर आज हा स्टॉक 711 रुपये किमतीवर ट्रेड करत आहे.
नुकताच केसर इंडिया कंपनीने आपल्या पात्र गुंतवणुकदारांना एका शेअरवर 6 बोनस शेअर्स वाटप केले होते. कंपनीने बोनस शेअर्स वाटप करण्याची रेकॉर्ड तारीख म्हणून 19 मार्च 2024 हा दिवस निश्चित केला होता. 2024 या वर्षात केसर इंडिया स्टॉक 363 टक्के वाढला आहे. केसर इंडिया ही कंपनी मुख्यतः रिअल इस्टेट क्षेत्रात व्यवसाय करते. या कंपनीचे शेअर्स 1 जानेवारी 2024 रोजी 146.38 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. तर 4 जून 2024 रोजी या कंपनीचे शेअर्स 677.30 रुपये किमतीवर पोहचले होते. मागील एका महिन्यात केशर इंडिया कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना 53 टक्के परतावा कमावून दिला आहे.
महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.