
JP Associates Share Price | जेपी असोसिएट्स कंपनीचे शेअर्स बुधवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये 10 टक्के घसरणीसह 11.99 रुपये किमतीवर पोहचले होते. तर मंगळवारी देखील जेपी असोसिएट्स स्टॉकमध्ये घसरण पाहायला मिळाली होती. स्टॉकमध्ये घसरण होण्याचे मुख्य कारण म्हणजे 3 जून 2024 रोजी राष्ट्रीय कंपनी कायदा न्यायाधिकरणने ICICI बँक आणि स्टेट बँक ऑफ इंडियाची जयप्रकाश असोसिएट्स विरोधातील दिवाळखोरी याचिका स्वीकारली आहे.
जेपी असोसिएट्स कंपनीचे शेअर्स आपल्या सर्वकालीन उच्चांक किंमत पातळीवरून 96 टक्के खाली आले आहेत. आज गुरूवार दिनांक 6 जून 2024 रोजी या कंपनीचे शेअर्स 4.98 टक्के घसरणीसह 11.45 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.
11 जानेवारी 2008 रोजी जेपी असोसिएट्स कंपनीचे शेअर्स 297.60 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. तर 5 जून 2024 रोजी जेपी असोसिएट्स स्टॉक 11.99 रुपये किमतीवर पोहचला होता. या काळात कंपनीच्या शेअर्समध्ये जवळपास 96 टक्केची घसरण पाहायला मिळाली होती. मागील एका महिन्यात जेपी असोसिएट्स कंपनीचे शेअर्स तब्बल 36 टक्के घसरले होते. तर 6 मे 2024 रोजी हा स्टॉक 18.72 रुपये किमतीवर ट्रेड करत होता. 5 जून 2024 रोजी या कंपनीचे शेअर्स 11.99 रुपये किमतीवर आले होते.
जेपी असोसिएट्स कंपनीने एकूण 29361 कोटी रुपये कर्ज थकीत केले आहे. जयप्रकाश असोसिएट्स कंपनीवर एकूण 17,700 कोटी रुपये कर्ज असून ते व्याजासह 29361 रुपये झाले आहे. जेपी असोसिएट्स कंपनीला कर्ज देणाऱ्या संस्थांमध्ये ICICI बँक, स्टेट बैंक ऑफ इंडिया आणि IDBI बँकेच्या नेतृत्वाखालील कन्सोर्टियममध्ये 22 कर्जदारांचा समावेश आहे. मागील 4 वर्षात जेपी असोसिएट्स कंपनीच्या शेअर्सची किंमत 705 टक्के वाढली होती. 5 जून 2020 रोजी जेपी असोसिएट्स कंपनीचे शेअर्स 1.49 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. 5 जून रोजी हा स्टॉक 11.99 रुपये किमतीवर पोहचला होता.
महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.