
Suzlon Share Price | सुझलॉन एनर्जी कंपनीचे शेअर्स सोमवारी 5 टक्क्यांच्या घसरणीसह ट्रेड करत होते. तर आज या कंपनीचे शेअर्स मजबूत तेजीत वाढत आहे. अनेक ब्रोकरेज हाऊस सुझलॉन एनर्जी स्टॉकबाबत उत्साही पाहायला मिळत आहे. मागील एका वर्षात या कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना 230 टक्के परतावा कमावून दिला आहे. ( सुझलॉन एनर्जी कंपनी अंश )
आज मंगळवार दिनांक 11 जून 2024 रोजी सुझलॉन एनर्जी स्टॉक 2.53 टक्के वाढीसह 48.60 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.
दरम्यान सुझलॉन एनर्जी कंपनीचे स्वतंत्र संचालक मार्क डेस्डेलेअर यांनी कंपनीच्या कॉर्पोरेट गव्हर्नन्स आणि पारदर्शकतेवर प्रश्न उपस्थित करत आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. मार्क डेस्डेलेअर यांनी त्यांच्या राजीनाम्यात कोणत्याही प्रकारच्या आर्थिक आणि कायदेशीर अनियमिततेचा उल्लेख केला नाही. कंपनीचे व्यवस्थापन मंडळ देखील पारदर्शकता वाढवण्यासाठी आणि माहितीची देवाणघेवाण प्रक्रिया सुधारण्यासाठी काम करत आहेत.
ICICI सिक्युरिटीज फर्मच्या तज्ञांनी या कंपनीचे शेअर्स खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे. तज्ञांच्या मते, हा स्टॉक पुढील काळात 60 रुपये किमतीवर जाऊ शकतो. नुवामा फर्मने देखील सुझलॉन एनर्जी स्टॉक खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे. तज्ञांच्या मते, सुझलॉन एनर्जी स्टॉक पुढील काळात 53 रुपये किमतीवर जाऊ शकतो.
सोमवारी सुझलॉन एनर्जी स्टॉक 5 टक्क्यांच्या घसरणीसह 47.35 रुपये किमतीवर क्लोज झाला होता. मागील एका या कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना 230 टक्क्यांपेक्षा जास्त परतावा कमावून दिला आहे. 2024 या वर्षात सुझलॉन एनर्जी स्टॉक तब्बल 24 टक्क्यांनी वाढला आहे. या कंपनीच्या शेअर्सची 52 आठवड्यांची उच्चांक किंमत पातळी 52.19 रुपये होती. तर नीचांक किंमत पातळी 13.28 रुपये होती. सुझलॉन एनर्जी कंपनीचे एकूण बाजार भांडवल 64,414 कोटी रुपये होते.
महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.